नवी दिल्ली- सक्त अंमलबजावणी संचालनालयाने ( ED arrests Delhi Health Minister ) दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Satyendar Jain arrest in New Delhi ) यांना अटक केली आहे. हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अटक ( hawala transactions Delhi Minister ) केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीच्या हवाला व्यवहाराप्रकरणी सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जल मंत्री आहेत. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आप आमदाराची चौकशी केली होती.
4.81 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त-अंमलबजावणी संचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी केला आहे. अंदाजे 4.81 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि सुनील जैन यांच्या पत्नी इंदू जैन यांच्याशी संबंधित आहे. ईडीने सांगितले की, ही रक्कम जमीन खरेदीसाठी किंवा दिल्ली आणि आसपासच्या शेतजमीन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली गेली.