महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED Arrest AAP MP Sanjay Singh : 'आप'ला मोठा झटका; दारू घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंह यांना अटक - Sanjay Singh latest news

ED Arrest AAP MP Sanjay Singh : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात ईडीने 'आप' खासदार संजय सिंह यांना अटक केली. सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी 5.30 वाजता सिंह यांना अटक करण्यात आली. पहाटे ईडीच्या पथकाने सिंह यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानावर छापा टाकला होता.

ED arrests AAP MP Sanjay Singh
ED arrests AAP MP Sanjay Singh

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 6:08 PM IST

Updated : Oct 4, 2023, 7:03 PM IST

नवी दिल्ली : ED Arrest AAP MP Sanjay Singh : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) बुधवारी 'आम आदमी पक्षा'चे (आप) खासदार संजय सिंह यांना अटक केली. सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. पहाटे ईडीच्या पथकानं सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. त्यामुळं हा 'आप'साठी मोठा झटका मानला जात आहे.

संजय सिंह यांना अटक :अटक केल्यानंतर ईडी संजय सिंह यांना ईडी मुख्यालयात नेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ते रात्रभर ईडीच्या लॉकअपमध्ये राहणार असून, गुरुवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आम आदमी पक्षात संजय सिंह यांचे वजन आहे. आता त्यांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दारू घोटाळ्यात आतापर्यंत झालेल्या सर्व अटकेमध्ये कोणालाही जामीन मिळू शकलेला नाही.

संजय सिंह यांनी केली होती टिंगल :बुधवारी सकाळी ईडीने छापा टाकला तेव्हा, संजय सिंह यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. फोटोमधून त्यांनी ‘फक्कड हाऊसमध्ये ईडीचे स्वागत आहे,’ असं उपरोधिकपणं लिहिलं होतं. ईडीच्या छाप्यावर 'आप'नं तिखट प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, तथाकथित दारू घोटाळ्याबद्दल गेल्या एक वर्षापासून आवाज उठवला जात आहे, पण त्यांना एक पैसाही मिळाला नाही. त्यांनी 1 हजारहून अधिक वेळा छापे टाकले. कुठेही काहीही सापडलं नाही. त्याचप्रमाणे, संजय सिंह यांच्याकडं देखील त्यांना काहीच सापडणार नाही.

दारू घोटाळ्यात AAP निशाण्यावर : कथित दारू घोटाळ्यातील AAP नेत्यांवर कडक कारवाई केली जात आहे. संजय सिंह यांना अटक करण्यापूर्वी सीबीआय, ईडीने केजरीवाल सरकारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. यानंतर सिसोदिया यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचा -

  1. Manish Sisodia Bail : मनिष सिसोदियांना दिल्ली हायकोर्टाचा झटका, जामीन नाकारला
  2. Chargesheet by ED against Sisodia: दिल्ली दारू घोटाळा! सिसोदियांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल
  3. Manish Sisodia: मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, उद्या जामिनावर सुनावणी
Last Updated : Oct 4, 2023, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details