महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Money Laundering Case : अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर यांना ईडीकडून अटक - avantha group promoter gautam thapar arrested

ईडीकडून थापर यांची कंपनी अवंथा रिअलटी, येस बँक सहसंस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या पत्नी यांच्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली जात आहे. तर याआधी राणा कपूर यांच्या पत्नीची पीएमएलए कायद्याअंतर्गत चौकशी करण्यात आली आहे.

gautam thapar
गौतम थापर

By

Published : Aug 4, 2021, 8:50 AM IST

Updated : Aug 4, 2021, 9:47 AM IST

नवी दिल्ली -सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांच्या मुंबई आणि दिल्लीतील विविध व्यवसायांच्या ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. यानंतर मंगळवारी रात्री मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आली.

आज बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी ईडी कोठडी मागण्याची शक्यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईडीकडून थापर यांची कंपनी अवंथा रिअलटी, येस बँक सहसंस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या पत्नी यांच्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली जात आहे. तर याआधी राणा कपूर यांच्या पत्नीची पीएमएलए कायद्याअंतर्गत चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा -Raj Kundra case : पॉर्नोग्राफी प्रकरणात गहना वशिष्ठला दिलासा नाहीच

याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेतल्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयने एफआयआरमध्ये असे आरोप केला होता की, येस बँक लिमिटेडचे ​​तत्कालीन एमडी आणि सीईओ राणा कपूर यांनी दिल्लीतील एका प्रमुख स्थानावर बाजार भावाच्या तुलनेत कमी भावात बेकायदेशीर ताबा मिळवला. जी अवंथा रिअल्टी ग्रुपशी संबंधित होती. येस बँक लिमिटेडद्वारे त्यांना नवीन आणि अतिरिक्त कर्जा देण्यासाठी आणि अवंथा रिअॅलिटी लिमिटेड ARL ला कर्ज मंजूर करण्यासाठी आणि अवंथा ग्रुप कंपन्यांना पुरवलेल्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या क्रेडिट सुविधांमध्ये सवलती, शिथिलता आणि माफी वाढवण्यासाठी प्रमुख स्थानावर ताबा मिळवण्यात आला, असे ईडीने म्हटले आहे.

बाजारभावाच्या तुलनेत कमी भावात रियलटी फर्मकडून टोनी दिल्ली परिसरात बंगला खरेदी करून 307 कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मागच्या वर्षी सीबीआयने कपूर आणि त्यांच्या पत्नी बींदू यांना ताब्यात घेतले होते. तसेच त्याबदल्यात सुमारे 1,900 कोटी रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करुन दिले होते. सीबीआयला संशय आहे की, दिल्लीतील अमृता शेरगिल मार्गावरील 1.2 एकर बंगल्याचा सवलतीचा व्यवहार ब्लिस अडोब प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून झाला. त्याबदल्यात राणा यांच्या येस बँकेकडून 1,900 कोटींपेक्षा अधिक कर्ज वसूली न करण्याचे ठरले होते.

Last Updated : Aug 4, 2021, 9:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details