मुंबई- आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केल्यापासून आर्थर रोड जेलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. यावर ईडीने मंगळवारी उत्तर सादर केले आहे. या प्रकरणात अनिल देशमुख मुख्य सूत्रधार आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला असल्याचा ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर ईडीने प्रतिज्ञापत्रातून ( Anil Deshmukhs bail application ) बाजू मांडली आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटले, की की मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच कटाचे मुख्य सूत्रधार ( mastermind Anil Deshmukh ) आहेत. देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग करत खूप माया जमविली आहे. या संदर्भात ईडीला अनेक पुरावेदेखील मिळाले आहेत, असा दावा ईडीकडून प्रतिज्ञापत्रात करण्यात ( ED affidavit in Anil Deshmukh case ) आला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शविला ( ED opposed bail to Anil Deshmukh ) आहे. उद्या अनिल देशमुख यांच्या जामिन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध-ईडीच्यावतीने सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीने ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल हे 56 पानी प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे. देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकार्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचेही यात नमूद केलेले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये, असेही ईडीने म्हटलेले आहे. याशिवाय देशमुखांपेक्षाही वयाने मोठे असलेले अनेक आरोपी जेलमध्ये आहेत. त्यामुळे वाढत्या वयाचा दाखला देऊन जामीन मागणे चुकीचे असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार- भ्रष्टाचारातून मिळवलेल्या बेहिशेबी पैशातून देशमुखांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध मालमत्ता तयार केल्या आहेत. त्यांच्याच सूचनेवरून त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हे पोलीस अधिकाऱ्यांची नावे असलेल्या अधिकृत याद्या पोस्टिंगसाठी अनुकूल आणून देत असत. मुंबई शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील याद्याही तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कार्यालयात कॅबिनेट मंत्र्याशी सल्लामसलत करूनच तयार करण्यात आल्या होत्या. त्या याद्या पालांडे आणि रवी व्हटकर यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आल्याचंही यात म्हटलेलं आहे.