महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निवडणूक आयोगाकडून ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन - विवेक सहाय

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना निलंबित केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी ममता बॅनर्जींवर हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नसून तो एक अपघात होता. यामध्ये ममता यांच्या सुरक्षा रक्षकांची चूक होती, असे आयोगाने म्हटलं आहे.

निवडणूक आयोग
निवडणूक आयोग

By

Published : Mar 15, 2021, 8:47 AM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना निलंबित केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी ममता बॅनर्जींवर हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले. राज्याचे निरीक्षक आणि मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालावरुन हा निर्णय घेण्यात आला.

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नसून तो एक अपघात होता. यामध्ये ममता यांच्या सुरक्षा रक्षकांची चूक होती, असे आयोगाने म्हटलं आहे. राज्य मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय, विशेष निरीक्षक अजय नायक आणि विशेष पोलीस निरीक्षक विवेक दुबे यांनी बंगाल सरकारने दिलेली माहिती तपासली. या अहवालामध्ये पुरेशी माहिती नसल्याचा निर्वाळा या तिघांच्या समितीने दिला.

ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन

हल्ला नाही, तर अपघात -

नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. ही घटना हल्ला नसून, केवळ अपघात असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. दीदींवरील हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. तर भाजपाच्या एका शिष्टमंडळाने भारतीय निवडणूक आयोगाची भेट घेत, कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच हा हल्ला नौंटकी असल्याचे काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं.

दीदींचा व्हीलचेअरवरुन प्रचार -

दुर्घटनेनंतर ममतांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर रविवारपासून ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन आपला प्रचाराला सुरवात केली. बंगालमध्ये 27 मार्चपासून आठ टप्प्यांमध्ये निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. 2 मे रोजी या निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा -'ममता बॅनर्जी नाटक करतात तर, यशवंत सिन्हांना राजकारणाचं अपचन'

ABOUT THE AUTHOR

...view details