हैदराबाद Telangana DGP Anjani Kumar Suspended : भारतीय निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहिता आणि संबंधित नियमांचं उल्लंघन (Violation of Model Code of Conduct) केल्याबद्दल तेलंगाणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित केलं (ECI suspended Telangana DGP) आहे. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली आहे. अंजनी कुमार यांनी काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांची भेट (DGP met Revanth Reddy) घेतली होती.
निवडणूक आयोगाची मोठी कारवाई : तेलंगाणाचे पोलीस नोडल अधिकारी संजय जैन, ADGP महेश भागवत यांच्यासह महासंचालक अंजनी कुमार हे काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांच्या भेटीला गेले होते. या सर्वांनी रविवारी सकाळी रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यामुळंच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. आचारसंहितेच्या नियमाच्या उल्लंघनाचं कारण देत ECI कडून पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित केल्याचं सुत्रांनी सांगितलं.
रेवंत रेड्डी यांची घेतली होती भेट : तेलंगाणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांच्यावर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आपण ही कारवाई करत असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. रविवारी सकाळी निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना तेलंगाणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी काँग्रेस नेते तथा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती.
रेवंत रेड्डी यांना दिल्या होत्या शुभेच्छा : पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय जैन आणि महेश भागवत यांच्यासह रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. रेवंत रेड्डी यांना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छही भेट देतानाचा या सर्व अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. ही कृती आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांच्यावर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केली.
हेही वाचा -
- ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास
- साडेसहाव्या वर्षी घर सोडलं, आता राजस्थानमध्ये भाजपासाठी गेमचेंजर! जाणून घ्या कोण आहेत बाबा बालकनाथ
- महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास - शरद पवार