गुवाहाटी - आसाममधील भाजपाच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते हेमंत बिस्वा शर्मा यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बोडोलँड पिपल्स फ्रंटचे नेता हग्रामा मोहिलरी यांना धमकी दिल्याचा आरोप हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावर आहे.
हेमंत बिस्वा शर्मा यांना 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. शर्मा यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) गैरवापर करून मोहिलरीला तुरूंगात पाठवण्याची धमकी दिल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने केली होती. बोडोलँड पीपल्स फ्रंट हा आसाममधील काँग्रेसचा सहयोगी पक्ष आहे.