पणजी (गोवा) -अंधारातून उजेडाकडे नेणारा सण म्हणजे ख्रिस्ती ( Christians celebrate Easter Goa ) बांधवांचा ईस्टर. या दिवशी येशू ख्रिस्ताचा पुनर्जन्म होतो म्हणून ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुड फ्रायडे ला येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाल्यानंतर आजच्या दिवशी त्यांचा पुनर्जन्म होतो, म्हणूनच ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये ( Goa Easter day celebration) जाऊन हा आनंदोत्सव साजरा केला. गोव्यातही शनिवारच्या मध्यरात्रीला व रविवारच्या सुरुवातीला रात्रभर जागून ख्रिस्ती बांधवांनी हा आनंद उत्सव साजरा करत यावेळी प्रार्थनाही केली.
हेही वाचा -RCB Vs DC, IPL 2022 : दिनेश कार्तिकची फटकेबाजी! 'RCB'कडून दिल्लीचा पराभव
ख्रिस्ती धर्माचे उद्धारकर्ते असणाऱ्या येशू ख्रिस्ताचा गुड फ्रायडे ला मृत्यू झाल्यानंतर संडे ला त्यांचा पुनर्जन्म होतो आणि हा दिवस ख्रिस्ती बांधव ईस्टर संडे म्हणून साजरा करतात. शनिवारच्या उत्तरेला चर्चमध्ये अंधार करून मेणबत्तीच्या उजेडात काळोखातून उजेडाकडे जात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, असा नारा देत सर्व ख्रिस्ती बांधवांनी आज ईस्टर संडे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला. राज्यातील सर्व चर्चमध्ये नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून हा आनंद उत्सव साजरा केला. यावेळी सर्व नागरिकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाप्रित्यर्थ प्रार्थना करत एकमेकांना शुभ संदेश दिले.