नवी दिल्ली Earthquake in Delhi NCR : दिल्ली-एनसीआर पुन्हा भूकंपानं हादरलं आहे. शुक्रवारी दुपारी दिल्ली, एनसीआरसह काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात 6.1 तीव्रतेच्या भूकंपानंतर गुरुवारी दिल्ली-NCR आणि उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.50 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलच्या उत्तर-ईशान्येस 241 किलोमीटर अंतरावर होता.
लोकांमध्ये घबराट :या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक लोकांनी फर्निचर थरथरल्याचं सांगितलं. या भूकंपासंदर्भात एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यासोबतच उत्तर भारतातील पंजाब आणि हरियाणा भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के जाणवल्यानं लोक सैरभैर झाल्याचं दिसून आलं.
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू :अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यासोबतच उत्तर भारतातही याच भूकंपाचे मोठ्या प्रमाणावर धक्के जाणवले. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, लाहोर, इस्लामाबाद आणि खैबर पख्तुनख्वा शहरातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेच्या किंवा जीवित हानीचं कोणतंही वृत्त आजूनपर्यंत तरी हाती आलेलं नाही. मात्र भूकंपाची तीव्रता पाहता मोठ्या नुकसानीचा अंदाज आहे.
पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के : देशाच्या हवामान खात्यानुसार, पाकिस्तानच्या काही भागात 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे पाकिस्तानच्या हवामान खात्याने एक्स पूर्वीचे ट्विटरवर पोस्ट केलं आहे. 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप हिंदुकुश प्रदेशात 213 किलोमीटर खोलीवर दुपारी 2:20 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला.
हेही वाचा -पालघरच्या डहाणू भागात पून्हा भूकंपाचे धक्के, 'या' भागात झालं नुकसान