मेघालय (शिलाँग ): नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. बुधवार 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. महाराष्ट्रातील नाशकातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या पश्चिमेला ८89 किमी असून तो जमिनीपासून 5 किमी खोलीवर होते. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ( Earthquake Tremors At East North East )
भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी : मंगळवारी लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती आणि सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी हे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलपासून 191 किमी उत्तरेस होता.
इंडोनेशियाच्या भूकंपात १६२ लोकांचा मृत्यू :नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, कारगिल, लडाखच्या उत्तरेस 191 किमी अंतरावर 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सकाळी 10.05 वाजता भूकंप झाला. इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावा येथे सोमवारी झालेल्या ५.६ तीव्रतेच्या भूकंपात १६२ लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले.यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम जावामधील सियांजूर शहरात 10 किलोमीटर खोलीवर भूकंप झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भागात भूकंप झाला तो भाग दाट लोकवस्तीचा आणि भूस्खलनाचा धोका असल्याने अनेक भागातील तात्पुरती घरे ढिगाऱ्या खाली आहेत. अजूनही कोसळलेल्या इमारतींखाली अडकलेल्या इतर लोकांना वाचवण्यासाठी बचावकर्ते रात्रभर काम करत होते.
2018 च्या भूकंपात 2,000 हून अधिक लोक मारले गेले : प्रादेशिक गव्हर्नर रिदवान कामिल यांनी सांगितले की, 162 लोक ठार झाले आहेत, 700 हून अधिक जखमी झाले आहेत आणि 13,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. त्यांनी भीती व्यक्त केली आहे की जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण बरेच लोक अजूनही घटनास्थळी अडकले आहेत. इंडोनेशियामध्ये भूकंप सामान्य आहेत, जे पॅसिफिकमधील टेक्टोनिक क्रियाकलापांच्या 'रिंग ऑफ फायर' प्रदेशावर बसले आहेत, सुलावेसीमध्ये 2018 च्या भूकंपात 2,000 हून अधिक लोक मारले गेले.