नवी दिल्ली : बर्मा, म्यानमारमध्ये आज पहाटे ३.५२ च्या सुमारास ६.१ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का ( Earthquake tremors in Burma ) बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, ( National Center for Seismology ) भूकंपाची खोली जमिनीखाली 140 किमी होती.
दरम्यान, 21 सप्टेंबरला चिलीच्या कॉन्सेप्शन शहरात भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. मात्र, यात कोणतेही नुकसान झाले नव्हते. त्याच वेळी, 18 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. यातही कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
का होतात भूकंप?पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण, कवच. कवचाच्या वरच्या आवरण गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50-किमी-जाड थर अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे ज्याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या टेक्टोनिक प्लेट्समध्ये जेव्हा कंपन कंपने होतात तेव्हा भुंकप होते.
काय आहे भुकंपाची कारणे -मानवाने निसर्गाशी केलेल्या छेडछाडीमुळे देखील भुकंप होते. तर, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे भुकंप होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, मोठ मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा भुसुरुंग, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.