महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Earthquake in Uttarakhand : 6 महिन्यांत 10 व्या भूकंपानं हादरलं उत्तराखंड; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

Earthquake in Uttarakhand : उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यापासून 48 किलोमीटर अंतरावर भूकंप झालाय. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आलीय.

Earthquake in Uttarakhand
Earthquake in Uttarakhand

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 2:05 PM IST

उत्तर काशी (उत्तराखंड) Earthquake in Uttarakhand : उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्याजवळ धरणीकंप झालाय. उत्तराखंडच्या सीमावर्ती जिल्ह्याच्या पिथौरागढपासून 48 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पिथौरागढ जिल्ह्यापासून उत्तर-पूर्व दिशेनं 48 किलोमीटर अंतरावर होता. मागील सहा महिन्यांत उत्तराखंडात हा दहावा भूकंप झालाय. सुदैवानं या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के : उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्याजवळ तसंच शेजारील देश नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्येही 4 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. नेपाळमधूनही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. हरियाणातील फरिदाबादमध्येही रविवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. फरिदाबादमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 इतकी होती.

एकाच दिवसात अफगाणिस्तानला चार भूकंपांचे धक्के : रविवारी एकाच दिवसात अफगाणिस्तानला तब्बल चार भूकंपाचे धक्के बसले होते. सकाळी 9 ते 11 या दोन तासांत हे चार भूकंप झाले. अफगाणिस्तानात 7 ऑक्टोबरलाही एकाच दिवसात 6 भूकंप झाले होते. अफगाणिस्तानमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या एकापाठोपाठ भूकंपात आतापर्यंत सुमारे 4 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तसंच नेहमी होणाऱ्या तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

उत्तरकाशीत गेल्या 6 महिन्यांत 10 भूकंप : उत्तराखंडचे डोंगराळ जिल्हे भूकंपाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांत 10 वेळा भूकंप झाले आहेत. उत्तराखंडमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञ वर्तवत आहेत. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, उत्तराखंडमध्ये मोठा भूकंप झाला तर त्याचा परिणाम दिल्ली आणि एनसीआरपर्यंत दिसून येईल. आता होणारे छोटे भूकंप हे मोठ्या भूकंपांचे 'ट्रेलर' असल्याचंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की, पृथ्वीच्या आत जमा होणारी ऊर्जा ती ज्या स्वरूपात बाहेर यायला हवी त्या स्वरूपात बाहेर पडण्यास सक्षम आहे. त्यामुळं शास्त्रज्ञांना मोठा भूकंप होण्याची भीती आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांना यापूर्वीच भूकंपाचे धक्के बसले आहेत.

हेही वाचा :

  1. Delhi Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला, दिल्लीतही जाणवले धक्के
  2. Afghanistan Earthquake : भय इथलं संपत नाही! दुसऱ्या भूकंपानं अफगाणिस्तान पुन्हा हादरलं
  3. Afghanistan Earthquake : शक्तिशाली भूकंपानं अफगाणिस्तानमध्ये त्राहीमाम; 30 मिनिटांत 4 धक्के, 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details