नोनी (मणिपूर) : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार मंगळवारी पहाटे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात 3.2 तीव्रतेचा भूकंप आला. राज्याला पहाटे 2.46 च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला असून त्याची खोली 25 किमी होती.
अफगाणिस्तान आणि तजिकिस्तान मध्ये भूकंप : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, मंगळवारी अफगाणिस्तान आणि तजिकिस्तान मध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तान मधील भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 4.1 एवढी होती. हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर, 36.38 अक्षांश आणि 70.94 रेखांशावर झाला. तर ताजिकिस्तानला जाणवलेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 4.3 एवढी होती.
19 फेब्रुवारीला भूकंप : यापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा शहराला भूकंपाचा धक्का बसला होता. मात्र तेथे कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रविवारी सकाळी 7.13 च्या सुमारास 3.4 सेकंद भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर घाबरलेल्या रहिवाशांनी घरातून बाहेर रस्त्यावर धाव घेतली. त्याच दिवशी मध्य प्रदेशातही 3.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, इंदूरच्या नैऋत्येला सुमारे 151 किमी अंतरावर धार येथे दुपारी 1 च्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली अंदाजे 10 किमी खोलीवर होता.
भारताची पाच झोनमध्ये विभागणी : भारतीय मानक ब्युरोने भारताची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. पाचवा झोन हा सर्वात धोकादायक मानला जातो. या झोनमध्ये भूकंपाने सर्वाधिक विध्वंस होण्याची शक्यता असते. देशाच्या 11 टक्के भागाचा पाचव्या झोनमध्ये समावेश आहे. या झोनमध्ये जम्मू-काश्मीर आणि काश्मीर खोरे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, गुजरात आणि ईशान्येकडील सर्व राज्ये आहेत.
म्हणून होतात भूकंप : पृथ्वीमध्ये खोलवर टेक्टोनिक प्लेट्स असतात. या टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल, चढ - उतार आणि एकमेकांवर आदळणे यामुळे त्यांच्यात सतत तणावाची स्थिती निर्माण होते. सर्वसामान्यपणे या ताणावाचे रूपांतर ऊर्जेत झाल्याने भूकंपाचे धक्के बसतात. जर ऊर्जा मोठ्या प्रमाणात सोडली गेली असेल, तर भूकंपाचे धक्के जोरदार जाणवतात म्हणजेच भूकंपाची तीव्रता ही खूप जास्त असते.
भारतात मोठा भूकंप येऊ शकतो : कानपूर आयआयटीचे प्राध्यापक जावेद मलिक यांच्या म्हणण्यानुसार, तुर्कीनंतर आता भारतातही मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भारतातील विविध भागांत सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वीच लखनऊ पासून दिल्लीपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. कानपूर आयआयटीच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी यावर संशोधन केले आहे. भारतात येणाऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय, कच्छ किंवा अंदमान निकोबार बेट देखील असू शकतो असा त्यांचा दावा आहे.
हेही वाचा :Assembly Election Exit Poll : तीन राज्यांचा एक्झिट पोल ; त्रिपुरा, नागालँडमध्ये फुलणार कमळ!, मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती