बारीपाडा (ओडिशा) : ओडिशातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या (MSCBU) दीक्षांत समारंभात शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, मुर्मु यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. परंतु, झालेल्या प्रकारामुळे गोंधळही उडाला. त्यावर कुलगुरुंनी माफिही मागितली आहे. तर, एका विद्युत कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अध्यक्षांचे अभिभाषण सुरू होताच वीजपुरवठा ठप्प झाला. व्यासपीठावरील दिव्यांच्या प्रकाशाखाली राष्ट्रपतींनी भाषण केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुर्मू यांच्या संबोधनादरम्यान, काही मिनिटे (9 मिनिटे) वीज खंडित झाली होता. मात्र, वीजपुरवठा खंडित होऊनही अध्यक्षांनी आपले भाषण सुरूच ठेवले. एमएससीबी विद्यापीठाचे कुलगुरूंनी दीक्षांत समारंभात झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
'नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार केलेला बरा' : पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, पदवी मिळाली म्हणजे शिक्षण प्रक्रिया संपली असा होत नाही. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. तसेच, उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यापैकी काही नोकरी करतील, काही व्यवसाय करतील तर काही संशोधनही करतील. मात्र, नोकरी करण्याचा विचार करण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार केलेला बरा असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठाने एक उष्मायन केंद्र स्थापन केले आहे आणि विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सामान्य लोकांना स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी मदत केली आहे. हे जाणून मला आनंद झाला. मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाच्या तीन दिवसीय दौऱ्याचा समारोप केला.