महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Durg Police Arrested Thief : छत्तीसगडमध्ये 3 कोटीचा दरोडा; दुर्ग पोलिसांनी नागपूरच्या आरोपीच्या गोव्यातून आवळल्या मुसक्या

छत्तीगडमधील दुर्ग परिसरात 7 फेब्रुवारीला दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल 3 कोटीचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी दुर्ग पोलिसांनी नागपुरातील आरोपीच्या गोव्यातून मुसक्या आवळल्या आहेत. अक्षय ईराणी असे या दरोडेखोराचे नाव आहे.

Durg Police Arrested Thief
आरोपीसह पोलीस पथक

By

Published : Feb 13, 2023, 10:28 PM IST

दुर्ग : छत्तीसगडमधील दुर्ग शहरात 3 कोटीचा दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या दरोड्याप्रकरणी दुर्ग पोलिसांनी नागपूरच्या आरोपीच्या गोव्यातून मुसक्या आवळल्या आहेत. अक्षय ईरानी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अक्षयने एका वर्षात दुर्गमध्ये 8 तर दोन वर्षात नागपुरात तब्बल 40 दरोडे टाकल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

छत्तीसगडमध्ये 3 कोटीचा दरोडा; दुर्ग पोलिसांनी नागपूरच्या आरोपीच्या गोव्यातून आवळल्या मुसक्या

दुर्ग पोलिसांनी गोव्यातून आवळल्या मुसक्या :दुर्ग येथील आदर्श नगरात पंकज राठी यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात चोरांनी 3 कोटीवर डल्ला मारला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत अखेर या दरोड्याचा छडा लावला आहे. यातील आरोपी अक्षय ईराणी असल्याचे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधून काढले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढले. तो मुंबईत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मुंबई गाठली. मात्र अक्षयने गोव्यात पळ काढल्याचे तांत्रिक माहितीवरुन स्पष्ट झाले. त्यानंतर छत्तीसगडचे पोलीस पथक गोव्यात जाऊन धडकले. पोलिसांच्या पाच सदस्यीय पथकाने गोव्यात अक्षयच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याची विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेत त्याच्याकडून या दरोड्याची माहिती घेत त्याला अटक केली.

चोरीच्या पैशातून अंजुना बिचवर केली मौजमस्ती :आमदार ब्रिजमोहन अग्रवाल यांचे नातेवाईक पंकज राठी यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर अक्षयने 1.50 लाख रुपये घेत मित्रांना फिरायला नेले. अंजुना बिचवर हे सगळे दरोडेखोर चोरीच्या पैशाने मौजमस्ती करत होते. आरोपींना पकडण्यासाठी दुर्ग पोलिसांचे पथक मुंबई, पुणे, गोव्याला रवाना झाले होते. दुसरीकडे अक्षय त्याच्या साथिदारांसोबत अंजुना बीचवर मौजमस्ती करत होता. मात्र पोलिसांनी अक्षयच्या मुसक्या आवळल्या.

नागपुरात दोन वर्षात 40 दरोडे :दुर्ग पोलिसांनी अक्षयच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचा कसून तपास केला. यावेळी अक्षयने एका वर्षात दुर्ग जिल्ह्यात 8 तर नागपुरात 2 वर्षात 40 दरोडे टाकल्याची माहिती दिली. यासोबतच नागपुरात अक्षयवर 41 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, फसवेगिरी, यासह लुटमार, दरोडा आणि खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - Ghulam Rasool Balyawi : रामदेव बाबाचे दहशतवादी कनेक्शन, तर बागेश्वर धाम बहुरूपी; जेडीयू नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details