लखनौ ( उत्तरप्रदेश ) : Duplicate Salman Khan arrested डुप्लिकेट सलमान खानने सोमवारी लखनौ सिटी स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले. आरपीएफने त्याला रेल्वे न्यायालयात पाठवले. 23 ऑगस्ट रोजी डुप्लिकेट सलमान खान या नावाने प्रसिद्ध असलेल्या आझम अली अन्सारीने दालीगंजजवळील रेल्वे ट्रॅकवर सोशल मीडियासाठी एक व्हिडिओ बनवला Duplicate Salman Khan video होता. हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने आझम अलीविरोधात गुन्हा दाखल केला. डुप्लिकेट सलमान खान व्हिडिओमध्ये लखनऊ सिटी स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅकवर 'तेरे नाम हमने किया है' या ट्रॅकवर पडून व्हिडिओ बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने आझम अली अन्सारी उर्फ डुप्लिकेट सलमान खानविरुद्ध आरपीएफ कायद्याच्या कलम 147, 145 आणि 167 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.