हैदराबाद - ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते 99 वर्षाचे होते. ब्रिटनमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींमधील ब्रिटीश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप भारताशी खास नाते होते. प्रिन्स फिलीप हे चारवेळा भारतात आले होते. तीनवेळा राणी एलिझाबेध यांच्यासोबत तर एकदा स्वतंत्र भारतभेटीवर आले होते. प्रिन्स फिलिप यांनी 1959 मध्ये प्रथमच भारत भेट दिली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे स्वागत केले होते. त्यावेळी फिलिप हे भारताचे शेवटचे व्हायसराय लॉर्ड माउंटबॅटन यांचे पुतणे म्हणून परिचित होते.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्या तारुण्यातील फोटो जालीयनवाला बाग हत्याकांडावर भाष्य -
1959 नंतर 1961, 1983 आणि 1997 मध्ये ते भारतात आले होते. 1961 मध्ये जेव्हा ते भारतात आले होते. तेव्हा त्यांनी मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना भेट दिली होती. जेव्हा ते 1997 मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडावर भाष्य केलं होतं. या हत्याकांडातील जखमी मृतांची संख्या विचारली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप प्रिन्स फिलिप कुटुंबासमवेत फ्युज बॉक्सची तुलना भारतीयांशी केली होती
1999 मध्ये स्कॉटिश कारखान्यास भेट दिली असता फ्यूज बॉक्सकडे पाहून त्यांची तुलना त्यांनी भारतीयांशी केली होती. हे एखाद्या भारतीय व्यक्तीने बनवले असावे, ते क्रूडसारखे दिसते, असे ते म्हणाले होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर आपल्याला काउबॉय असे म्हणायचे होते, हे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. तसेच 2009 मध्ये त्यांनी बकिंगहॅम पॅलेसच्या रिसेप्शनमध्ये भारतीय वंशाचे पाहुणे अतुल पटेल यांच्या नावावर वादग्रस्त भाष्य केले होते. जयपूरची राजमाता गायत्री देवी आणि त्यांचे पती राणी एलिझाबेथ, प्रिन्स फिलिप यांचे चांगले मित्र होते.
ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन प्रिन्स फिलिप यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा -
- प्रिन्स फिलिप यांचा जन्म 1921 ला ग्रीसमध्ये झाला होता.
- प्रिन्स फिलिप यूनान यांचे धाकटे भाऊ प्रिन्स एन्ड्र्यू हे प्रिन्स फिलिप यांचे वडिल होते. तर त्यांची आई बॅटलबर्गची राजकुमारी एलिस होती.
- 1922 : फिलिप यांचे वडील हद्दपार झाल्यानंतर त्यांचे कुटुंब फ्रान्समध्ये गेले होते.
- 1928 : फिलिप आपल्या माउंटबॅटनच्या नातेवाईकांसोबत राहण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांच्या आजोबाने जर्मनविरोधी भावनेत पहिल्या महायुद्धादरम्यान आपले आडनाव बॅटनबर्गवरून माउंटबॅटन असे बदलले होते.
- 1939 : द्वितीय विश्वयुद्ध जवळ येताच फिलिप रॉयल नेव्हीमध्ये कॅडेट म्हणून दाखल झाले. नंतर त्यांनी हिंद महासागर, भूमध्य आणि प्रशांत समुद्रात सेवा बजावली. 1952 मध्ये त्यांची कमांडर म्हणून पदोन्नती झाली.
- 1947 : राजकुमारी एलिझाबेथ आणि फिलिप यांच्या विविहाची घोषणा झाली.
- 1948 : या जोडप्याचे पहिलं मूल, प्रिन्स चार्ल्स यांचा जन्म.
- 1950 : राजकुमारी ऐनीचा जन्म.
- 1952 : एलिझाबेथचे वडील किंग जॉर्ज यांचे निधन झाल्यानंतर एलिझाबेथ इंग्लडच्या महाराणी झाल्या.
- 1956 : फिलिपने ड्यूक ऑफ एडिनबर्ग पुरस्कार कार्यक्रम सुरू केला. ज्याचा विस्तार 100 हून अधिक देशांमध्ये आहे.
- 1960 : प्रिन्स अँड्र्यूचा जन्म
- 1964 : प्रिन्स एडवर्डचा जन्म
- 2009 : ब्रिटिश इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारे शाही व्यक्तिमत्व
- 2011 : कार्यभार कमी करत असल्याची घोषणा फिलिप यांनी केली.
- 2017 : वृद्धत्वामुळे आपण यापुढे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
- 16 फेब्रुवरी 2021 : फिलिप यांना लंडनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 16 मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
- 9 एप्रिल, 2021 : लंडनमधलं बकिंगहॅम पॅलेसच्या अधिकाऱ्यांनी प्रिन्स फिलिप यांचे दुखःद निधन झाल्याची घोषणा केली