महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन - ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती

ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप
ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप

By

Published : Apr 9, 2021, 4:49 PM IST

Updated : Apr 9, 2021, 5:28 PM IST

16:47 April 09

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन

राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप

 लंडन -  ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते 99 वर्षाचे होते. ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा पसरली आहे. पुढचा महिनाभर ब्रिटीश राजघराण्यात दुखवटा पाळला जाणार आहे. विंडसर पॅलेस इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.  

प्रिन्स फिलिप यांच्यावर नुकतचं हृदय शस्त्रक्रिया झाली होती. ते बराच काळ रुग्णालयात दाखल होते. प्रिन्स फिलिप आणि क्वीन एलिझाबेथ यांना चार मुले, आठ नातवंडे आणि 10 पनतू आहेत. बकिंघम पॅलेसकडून निवदेन जारी करून प्रिन्स फिलिप यांचे निधन झाल्याचे सांगतिले. वेल्सचे राजकुमार चार्ल्स,  राजकुमारी ऐन, राजकुमार ऐंड्र्यु, यॉर्कचे ड्यूक राजकुमार एडवर्ड, वेसेक्सचे राजकुमार अर्ल ही त्यांची चार अपत्ये आहेत. 

प्रिन्स फिलिप हे  ब्रिटीश राज घराण्यातील सर्वात जुने पुरुष सदस्य होते. प्रिन्स फिलिप यांनी 1947 मध्ये राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या पाच वर्षानंतर एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या राणी झाल्या होत्या. ब्रिटीश घराणेशाहीच्या इतिहासात महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांचा सर्वाधिक काळ चाललेला शाही संसार होता. प्रिन्स फिलिप यांनी राजघराण्यातील अनेक रूढीवादाला फाटा दिला होता.  

ग्लिक्सबर्ग राजघराण्याचे सदस्य फिलिप यांचा जन्म ग्रीक आणि डॅनिश राजघराण्यात झाला होता. त्यांचा जन्म ग्रीस (ग्रीस) येथे झाला होता, परंतु त्याच्या कुटुंबास त्याच्या बालपणातच देशातून हाकलण्यात आले होते. फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडममधून शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी 1939 मध्ये ब्रिटीश रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश घेतला.  दुसऱ्या महायुद्धात त्यांनी नेव्हल ग्राऊंड आणि पॅसिफिक सैन्यात काम केले होते. 

20 नोव्हेंबर 1949 ला एलिझाबेथ आणि फिलिप यांचा विवाह झाला -

युद्धानंतर सहाव्या जॉर्जने एलिझाबेथ आणि फिलिप यांच्या लग्नाला परवानगी दिली. मात्र, एलिझाबेथसोबत लग्न करण्यासाठी फिलिप यांना ग्रीक आणि डॅनिश रॉयल पदवीचा त्याग करून पूर्णपणे सामान्य ब्रिटिश नागरिक व्हावे लागले होते. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1949 ला एलिझाबेथ आणि फिलिप यांचा राजेशाही पद्धतीने विवाह झाला.  1952 मध्ये एलिझाबेथ ब्रिटनच्या महाराणी झाल्यानंतर सैन्यातील सेवा सोडली. त्यानंतर प्रिन्स फिलिप यांना 1957 मध्ये  'ड्यूक ऑफ एडिनबर्ग' ही पदवी देण्यात आली.

हेही वाचा -  आली लहर केला कहर! पीपीई कीटसह आरोग्य कर्मचारी ज्यूस सेन्टरवर, कोरोना रुग्णाला सोडलं रुग्णवाहिकेत

Last Updated : Apr 9, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details