महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa BJP : मगो'च्या पाठिंब्याने गोवा भाजपात धुसफूस; काहीआमदार बंडाच्या पवित्र्यात - groups in Goa BJP

गोवा भाजपमध्ये सत्ता स्थापनेपासून मगो'च्या पाठिंब्यामुळे चांगलीच धुसफूस सुरू झाली आहे. दरम्यान, काही आमदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेटही घेतली आहे. परंतु, काही तोडगा निघाला नाही. तसेच, काही आमदार बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे.

गोवा भाजप
गोवा भाजप

By

Published : Mar 22, 2022, 11:27 AM IST

गोवा (पणजी) - सोमवार (दि. 21 मार्च)रोजी गोवा भाजपने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. यावेळी भाजपला 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, मगोचा हा पाठिंबा आता भाजपची डोकेदुखी ठरत आहे. मगोच्या पाठिंब्यावरून भाजपात दोन गट पटले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक आमदारांनी आपली नाराजी व्यक्त करून पक्षाविरोधातच बंड केले आहे.

नाराज आमदारांची स्वतंत्र बैठक

सोमवारी भाजपने मगो च्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर, यातील काही आमदारांनी एक स्वतंत्र बैठक घेतली होती यात प्रवीण आरलेकर, जोशुआ डिसुझा, प्रेमेंद शेठ, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, रवी नाईक, गोविंद गावडे, बाबुश मोंसरात यांचा समावेश होता. बैठकीनंतर या सर्व आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

एका प्रायव्हेट हॉटेलमध्ये या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर या सर्व आमदारांनी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याविषयी बोलणे टाळले

काय आहे या आमदारांच्या नाराजीचे कारण?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. यामुळेच काही ठिकाणी भाजप उमेदवारांना पराभवाचा फटका बसला, तर काही उमेदवार काठावर पास झाले आहेत. काठावर विजयी झालेल्या आमदारांना यामुळेच मगो विरोधात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या आमदारांनी मगोला सत्तेत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा -गोव्याची धुरा प्रमोद सावंतांच्या हाती; सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

ABOUT THE AUTHOR

...view details