नवी दिल्ली :दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील विजय मंडल पार्कमध्ये उघडकीस आली आहे. या विद्यार्थिनीच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळून आला आहे. त्यामुळे लोखंडी रॉडने या विद्यार्थिनीचा खून करण्यात आल्याची माहिती दक्षीण दिल्लीचे पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी दिली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या मुलीवर रॉडने हल्ला :दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमधील अरबिंदो कॉलेजजवळ एका मुलीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलिसानी दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी दिली.
कमला नेहरु महाविद्यालयाची विद्यार्थिनी :पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता विजय मंडल पार्कमधील बाकड्याखाली मुलीचा मृतदेह पडलेला असल्याचे आडळून आल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी दिली. या मुलीचा मृतदेह रक्ताने माखलेला होता, तर तिच्या मृतदेहाशेजारी एक लोखंडी रॉड असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही विद्यार्थिनी दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या कमला नेहरु महाविद्यालयाची असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
स्वाती मालिवाल यांनी व्यक्त केले दुख :दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा मालवीय नगर येथील विजय मंडल पार्कमध्ये खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळून आला आहे. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी विद्यार्थिनीच्या खून प्रकरणावरुन मोठी टीका केली आहे. दिल्लीत गुरुवारी रात्री महिलेची गोळीबार करुन हत्या करण्यात आली, आणि आज पुन्हा एका विद्यार्थिनीचा खून करण्यात आला. दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा हल्लाबोलही स्वाती मालिवाल यांनी यावेळी केला.
हेही वाचा -
- Delhi Crime : जीममध्ये ओळख झालेल्या महिलेचा गोळ्या झाडून खून, माथेफिरुने संपविले स्वत:चेही जीवन!
- Anju Nasrullah Love Story : अंजू घरी परतल्यानंतर काय करणार, पती अरविंदने स्पष्टच सांगितले...