नवी दिल्ली -पंजाब विधानसभा निवडणुका जवळ येत असून अनेक कारणांवरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटत आहेत. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला पोहचत असून तो सोडवण्यासाठी मंगळवारी पक्षाचे प्रभारी हरीश रावत चंदीगढमध्ये दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे चार कार्यकारी अध्यक्षांचा उल्लेख 'पंच प्यारे' असा केला. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून रावत यांनी माफी मागावी, अशी मागणी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी प्रमुख मनजिंदरसिंग सिरसा यांनी केली.
नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांचा 'पंच प्यारे' असा उल्लेख हा धार्मिक अपमान आहे. गुरु गोविंद सिंग यांनी सुरू केलेल्या प्रथेचा रावत यांनी अपमान केला आहे. कोणत्याही सामान्य व्यक्तींचा धार्मिक शब्दांनी उल्लेख केला जात नाही, असे ते म्हणाले. रावत यांच्या विधानावर अकाली दल सुद्धा नाराज झाला आहे. रावत यांनी धार्मिक भावनांना ठेस पोहचवली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे अकाली दलाने म्हटलं.
काय म्हणाले होते रावत?