महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Crime : मद्यधुंद पतीने गर्भवती पत्नीला दुचाकीला बांधून ओढत नेले, महिलेची प्रकृती चिंताजनक

उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीतमध्ये एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली आहे. यामध्ये दारूच्या नशेत बुडालेल्या पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीला दुचाकीच्या मागे बांधून ओढत नेले. नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पुढे सरसावून पोलिसांना कळविले आणि महिलेची सुटका केली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितल्या जात आहे.

UP Crime
पीडित महिला

By

Published : Jan 15, 2023, 2:10 PM IST

पिलीभीत (उत्तर प्रदेश) :मद्यधुंद पतीने आपल्याच गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घुगचैन पोलीस ठाणे परिसरात समोर आली. क्रुर पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीचे दोन्ही हात मोटारसायकलला बांधून दूर अंतरापर्यंत ओढत नेले. दिवसाढवळ्या घडलेला हा प्रकार दक्ष नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला पतीच्या तावडीतून सोडविले. या प्रकरणी पीडित महिलेच्या भावाने आरोपीविरोधात तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

'ही' आहे घटना :घुगचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहणाऱ्या एका तरुणाने तहरीरमधील पोलिसांना संपूर्ण घटनेविषयी ही माहिती दिली. त्यानुसार, तक्रारदाराची बहीण कोमल (नाव बदललेले) हिचा विवाह शहरातीलच रहिवासी असलेल्या रामगोपालशी झाला होता. शनिवारी आरोपींनी पीडितेला शिवीगाळ करत जबर मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर विवाहितेला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला दुचाकीला बांधून लांबवर ओढत नेले. आजूबाजूच्या लोकांनी घटनेची माहिती पीडितेच्या माहेरच्या लोकांना दिली. यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचबरोबर विवाहितेच्या भावाने पोलिसांत तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

पती गंमत करत असल्याचे तिला वाटले; पण...:पीडितेने तिच्यासोबत घडलेली घटना पोलिसांना सांगितल्यानंतर तेसुद्धा थक्क झाले. आरोपी पतीने गर्भवती पत्नीला सुरुवातीला मारहाण केली. यानंतर तिचे दोन्ही हात मोटरसायकलच्या मागे बांधले आणि तिला मागे पळण्यास सांगितले. सुरुवातीला पीडितेला तिचा पती गंमत करत असल्याचे वाटले. मात्र पती रामगोपालने मोटारसायकलचा वेग वाढवला. त्यामुळे पीडित महिला खाली पडली. पतीने त्याचे अवस्थेत तिला गाडीला बांधून ओढत नेले. हे बघून लोकांनी आरडाओरड केली. परंतु, तरीही तो गाडी थांबविण्यास तयार नव्हता.

आरोपी पतीची पोलीस चौकशी सुरू :या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर यूपी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तक्रारीच्या आधारे आरोपी पती रामगोपालला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह सिरोही यांनी सांगितले की, घटनेची तक्रार विवाहित महिलेच्या भावाने दिला आहे. या आधारे आरोपीविरुद्ध खुनी हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details