महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Drones in Gurdaspur : आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा पाकिस्तानी ड्रोन ; बीएसएफच्या जवानांनी केला गोळीबार - Three kilos of heroin seized in drone

पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर ( International Border ) पुन्हा एकदा संशयास्पद ड्रोन दिसले. दक्ष सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची तारांबळ उडाली. बीएसएफचे गुरुदासपूरचे डीआयजी प्रभाकर जोशी यांनी ही माहिती दिली. ( Drone sighted Again on International Border )

Share: Drones in Gurdaspur
आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा पाकिस्तानी ड्रोन

By

Published : Jan 2, 2023, 11:40 AM IST

Updated : Jan 2, 2023, 4:38 PM IST

गुरदासपुर : पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये काल रात्री पाकिस्तानी ड्रोन (pakistani drone ) दिसले. बीएसएफच्या चंदू वडाळा चौकी आणि कासोवाल चौकीजवळ पाकिस्तानी ड्रोन दिसल्यानंतर जवानांनी आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानी ड्रोन पुढे घुसू नये म्हणून बीएसएफच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला ( BSF jawans opened fire ) होता.( Drone sighted Again on International Border )

सीमेवर पाकिस्तानी ड्रोन : बीएसएफचे गुरुदासपूरचे डीआयजी प्रभाकर जोशी यांनी सोमवारी सांगितले की, पंजाबच्या गुरुदासपूर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोन भारतात घुसल्याचे समजले. रविवारी रात्री ड्रोनला रोखण्यात आले. सकाळी 10.30 च्या सुमारास वडाळा चौकीजवळ आणखी एक ड्रोन दिसले.

ड्रोनवर गोळीबार : (Shooting at drones)जवानांनी केलेल्या कारवाईबाबत डीआयजी म्हणाले, तत्काळ ड्रोनवर गोळीबार करण्यात आला. रात्री बाराच्या सुमारास चंदू वडाळा चौकीजवळ आणखी एक ड्रोन दिसला.

ड्रोनमध्ये तीन किलो हेरॉईन जप्त : (Three kilos of heroin seized in drone ) त्याच वेळी, 4 डिसेंबर रोजी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ तीन किलो हेरॉइनसह ड्रोन जप्त करण्यात ( Drone seized with 3 kg heroin ) आले होते. पंजाब पोलिस आणि बीएसएफच्या संयुक्त कारवाईदरम्यान ही जप्ती करण्यात आली.

संशयित पिस्तूल आणि दारूगोळा जप्त :दुसर्‍या घटनेची माहिती देताना, सांगितले की, ३ डिसेंबर रोजी बीएसएफच्या जवानांनी चुरीवाला चुस्ती, फाजिल्काजवळ तीन पाकिटे जप्त केली होती. या ड्रोनमध्ये ७.५ किलो संशयित हेरॉईन, एक पिस्तूल, दोन ९ एमएम मॅगझिन आणि २. दारुगोळा जप्त करण्यात आला.

Last Updated : Jan 2, 2023, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details