श्रीनगर(जम्मू काश्मीर) - जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात रविवारी आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच पेलोड असलेले पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाj, शोध पथकाला सकाळी राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तल्ली हरिया चक परिसरात सीमेवर ड्रोनची हालचाल दिसली आणि त्यांनी त्यावर गोळीबार केला. ते म्हणाले की, जमिनीवरून गोळीबार केल्यानंतर ड्रोन खाली पडला.
Drone shot down : जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडला, मोठी घटना टळली
कठुआ जिल्ह्यात रविवारी (दि. 29 मे) आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच पेलोड घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा नेले जात होते. त्यामुळे मोठी घटना टळली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ड्रोनला पेलोड जोडले गेले होते आणि बॉम्ब निकामी पथक त्याचा तपास करत होते. सीमेपलीकडून सुरू असलेल्या ड्रोन कारवाया रोखण्यासाठी शोध पथकाला या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत कठुआचे एसएसपी आरसी कोतवाल म्हणाले, 'आमचे गस्ती पथक राजबागमध्ये होते. त्याचवेळी त्याच्या जवळ ड्रोन आल्याची माहिती मिळाली. आमच्या पथकाने त्या ड्रोनचा शोध घेतला आणि तो लगेच पाडला. यामध्ये पोलिसांना सात मॅग्नेटिक प्रकारचे बॉम्ब, आयईडी आणि सात अंडर बॅरल ग्रेनेड लाँचरही सापडले आहेत. यामुळे होणारी अनुचित घटना रोखण्यात यश मिळाले आहे.
हेही वाचा -Encounter : पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक