महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Accident : ट्रक थेट अंगावर आला! बाजूला झाला म्हणून वाचला;पाहा व्हिडीओ - कर्नाटक तुमकूर जिल्ह्यात बेंगळुरूकडे जाणारा ट्रक

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात बेंगळुरूकडे जाणारा ट्रक भरधाव वेगात रस्त्याच्या डाव्या बाजूला घुसला. त्यावेळी समोर गाडीवर बसलेला तरुण फोनवर बोलत होता. त्याला हा ट्रक आपल्या अंगावर येतोय हे दिसताच त्यांना गाडीवरुन उडी मारत आपला जीव वाचवला. या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. मात्र, तरुणाने लवकर बाजूला उडी मारल्याने तो वाचला नाहीतर काहीतरी अघडीत घडले असते.

Driver lost control and car overturned
Driver lost control and car overturned

By

Published : Feb 8, 2023, 10:11 PM IST

व्हिडिओ

तुमकूर (कर्नाटक): 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीप्रमाणे घडली ती ही आजची घटना. भरधाव जाणारा ट्रक अचानक आपल्या अंगावर येतो हे दिसताच गाडी टाकून पळणारा तरुण थोडक्यात वाचला. गाडीचा चुराडा झाला. कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील कुनिगल तालुक्यात मंगळवारी ही भीषण घटना घडली आहे. मनू नावाचा तरुण काही कामानिमित्त दुचाकीवरून कुनिगल तालुक्यातील अंचेपल्या येथे आला होता. हा तरुण हॉटेलसमोरील रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसला होता त्यावेळी ही घटना घडली आहे.

दुचाकीचा चुराडा : येथून जात असताना ट्रक हसनच्या बाजूने बेंगळुरूकडे जाणाऱ्या पार्सल ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात तो रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. भरधाव ट्रक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मनू लगेचच दुचाकी सोडून पळून जाण्यासाठी बाजूला झाला त्यामध्ये तो वाचला. भरधाव वेगात असलेल्या कॅंटरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चुराडा झाला.

अपघातात तरुण थोडक्यात बचावला : ही घटना घडली तेव्हा आजूबाजूचे लोक चक्क अवाक झालेले पाहायला मिळाले. या अपघातात तरुण थोडक्यात बचावला या गोष्टीबद्दल सर्व समाधान व्यक्त करत होते. अपघातानंतर चालकाने ट्रक काही पावले पुढे रस्त्यावर उभा केला. घटनेनंतर लगेचच आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले आणि चालकाला पकडण्यासाठी ट्रककडे धाव घेतली. अपघाताचे हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या :काही दिवसांपूर्वी बेंगळुरूच्या राजाजीनगरमध्ये गाडीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला होता. अपघातामुळे दुचाकीस्वार आपल्या दुचाकीपासून काही फूट अंतरावर पडला. बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली होती. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

तरुणाचा जीव धोक्यात गेला : कर्नाटकच्या राजधानीत रोड रेजच्या आणखी एका घटनेत, एका महिलेने भांडणानंतर ज्ञान भारती नगर भागात एका पुरुषाला तिच्या कारच्या बोनेटवर तीन किलोमीटरपर्यंत ओढले. ही घटना ज्ञानभारती पोलिस स्टेशन हद्दीतील उल्लाला मुख्य रस्त्याजवळ घडली जेव्हा आरोपी महिलेने चालविलेल्या कारने पुरुषाच्या कारला धडक दिली होती. यावेळीही अशीच घटना समोर आली आहे. भर रस्त्यावर चालणाऱ्या ट्रक रोडच्या बाजूला घुसल्याने तरुणाचा जीव धोक्यात गेला होता.

हेही वाचा :ट्रान्सजेंडर जोडप्याने दिला बाळाला जन्म! लिंग ओळख सांगण्यास नकार

ABOUT THE AUTHOR

...view details