महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lahaul Spiti Snowfall : लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले, पाण्याच्या शोधात गावकऱ्यांचा दूरवर प्रवास - बर्फवृष्टी

लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे लोकांचे हाल झाले आहेत. मुसळधार बर्फवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. अशा स्थितीत नागरिकांना नाल्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या शोधात 7 किमी पर्यंतचा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे.

Lahaul Spiti Snowfall
लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टी

By

Published : Feb 1, 2023, 7:56 PM IST

लाहौल स्पीती :हिमाचलच्यालाहौल स्पीती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार बर्फवृष्टी होत होती. आता हवामान थोडे ठिक होत नाही तेच, पांढरा बर्फ लोकांसाठी आपत्ती ठरत आहे. लाहौल खोऱ्यात 3 फूट बर्फवृष्टी झाल्यामुळे परिसरातील सर्व रस्ते सध्या वाहनांसाठी बंद आहेत. याशिवाय वीज, पाण्याची समस्याही रहिवाश्यांना भेडसावत आहे.

लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले

नागरिक पितात नाल्याचे पाणी :लाहौल खोऱ्यात बर्फवृष्टी झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची लाईन पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे लोकांना नाल्यांतून पाणी न्यावे लागत आहे. अनेक भागात गावकऱ्यांना पाणी आणण्यासाठी ५ ते ७ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. लाहौल खोऱ्यातील जोब्रांग पंचायतीबद्दल सांगायचे तर, पिण्याच्या पाण्याच्या पाईप मधील पाणी गोठल्यामुळे जोब्रांग, रेप आणि राशेल गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून; गावकरी 2 किमी अंतरावरील नाल्यातून पाठीवर पाणी वाहून नेत आहेत.

अनेक रस्ते बंद :त्याचबरोबर गावकऱ्यांना पाळीव प्राण्यांसाठी पाण्याची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय लाहौल खोऱ्यातील अनेक ग्रामीण भागात अजूनही वीज नाही, ती पूर्ववत करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी सतत प्रयत्नशील आहेत. लाहौल खोऱ्यातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बर्फवृष्टीमुळे लाहौलच्या अंतर्गत भागातील रस्ते बंद आहेत आणि दरवर्षी बर्फवृष्टीमुळे त्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. लोकांना बर्फात अनेक किलोमीटर चालावे लागते आणि त्यानंतर ते नाल्यातून पाणी आणून तहान भागवत असतात.

रस्त्यावरिल बर्फे दूर सारण्याचे कार्य : त्याचवेळी लाहौल स्पितीचे डीसी सुमित खिमटा सांगतात की, मनाली केलॉंग रस्ता बीआरओने फोर बाय फोर आणि स्टिंगारीपर्यंत वाहनांसाठी खुला केला आहे. यापुढेही रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. याशिवाय वीज व्यवस्था सुधारण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. लवकरच सर्व रस्त्यांवरून बर्फ हटवला जाईल आणि वीज व्यवस्थाही पूर्ववत होईल.

नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ : दरवर्षी पडणाऱ्या बर्फामुळे नागरिकांना प्रत्येकच वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात बर्फे साचल्याने, वाहतूक व्यवस्था कोलमडते. यामुळे नागरिकांचे सगळेच व्यवहार ठप्प होत असते, जसे की, नोकरीला किंवा कामाला जाणे बंद होते. ज्या लोकांचा व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहे, नद्या गोठल्याने आणि वाहतूक ठप्प पडल्याने, त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेज बंद होतात. महिलांना पिण्याचे पाणी, तसेच घरातील अनेक गोष्टी आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

ABOUT THE AUTHOR

...view details