नवी दिल्ली - भारत-म्यानमार सीमेवर सोने तस्करी करणारे दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या विदेशातील सोन्याची तस्करी या वाहनांमधून केली जात होती. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हे सोने पंजाबमधून आणण्यात आले होते.
घटना काय?
गुप्त माहितीनुसार दोन संशयित ट्रक भारत-म्यानमार सीमेवर सोन्याची वाहतूक करत होते. या दोन्ही ट्रकची सखोल तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात 35 कोटी रुपये किंमतीचे सोने आढळले. पंजाबमधून हे सोने आणले गेले होते. ट्रकमधील सोने इंधन टाकीच्या आतमध्ये लपवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.