नवी दिल्ली-सोने तस्करी करण्यासाठी चक्क आय़ात केलेल्या मशिनमध्ये सोन्याच्या डिस्क वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence ) लखनौ आणि मुंबई येथे सलग दोन कारवाया गेल्या आहेत. या कारवाईत सोने जप्त करून हवाई मार्गाने सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न ( gold smuggling though air rout ) हाणून पाडले आहेत.
आयात केलेल्या मोटर रोटरमध्ये 5.8 किलोच्या सोन्याच्या डिस्क; डीआरआयकडून मुंबईमधील आयातदाराला अटक - सोने तस्करी मुंबई आयातदार अटक
3.10 कोटी रुपयांचे डिस्क स्वरूपात 5.8 किलो सोने आयात केलेल्या मशीनच्या 2 मोटर रोटरमध्ये लपवून ( gold smuggling through motor rotors ) ठेवलेले आढळले आहेत. आयातदार हा दक्षिण मुंबईत होता. त्वरीत कारवाई करून त्याला अटक करण्यात आली.

आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. मशिनमध्ये सोन्याच्या डिस्क दडवलेल्या आढळल्या आहेत. लखनौमध्ये अशाच प्रकारे 5.2 किलो सोने जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत 2.78 कोटी रुपये आहे. ही सोने लपविण्याची सामान्य पद्धत होती, असे वित्त मंत्रालयाने ( Ministry of Finance on gold smuggling ) म्हटले आहे.