महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

President Murmu Will Take Oath Today : द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार, सरन्यायाधीश देणार शपथ

देशाच्या 15 राष्ट्रपती ( President ) म्हणून द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या आज शपथ ग्रहण करणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील.

President Murmu Will Take Oath Today
President Murmu Will Take Oath Today

By

Published : Jul 25, 2022, 7:33 AM IST

नवी दिल्ली -15 राष्ट्रपती ( President ) म्हणून द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या आज शपथ ग्रहण करणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी मोठ्या बहुमताने विजय मिळविला होता.

सर्वोच्च पद -राष्ट्रपती ( President ) पद भारताच्या घटनेतील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती ( President ) हेच देशाचे प्रथम नागरिक असतात. अनेक मोठ्या व्यक्तींनी याआधी हे पद भूषविले आहे. आता 15 व्या राष्ट्रपती ( President ) म्हणून द्रौपदी मुर्मू या पदाची शपथ घेणार आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ ग्रहणाचा हा समारंभ होईल. देशाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील.

सरन्यायाधीश देणार शपथ -राष्ट्रपदीपदाची ( President ) शपथ द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांना देशाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे देणार आहेत. सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणाऱ्या द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu )या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत. आदीवासी समाजात जन्मलेल्या व राष्ट्रपतीपदापर्यंत ( President ) पोहोचलेल्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत. या शपथविधी समारंभास राज्यसभेचे सभापती, पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांची उपस्थिती -राष्ट्रपती ( President ) द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांच्या शपथविधी समारंभासाठी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, संसदेच्या सदस्यांची उपस्थिती असणार आहे.

हेही वाचा -Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details