महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Draupadi Murmu Wins : भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड.. यशवंत सिन्हा पराभूत

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती ( 15th President Of India ) म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए ) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली ( Draupadi Murmu Elected As President Of India ) आहे. विरोधी यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला ( Yashwant Sinha Loses Presidential Battle ) आहे. राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Draupadi Murmu 1
द्रौपदी मुर्मू

By

Published : Jul 21, 2022, 8:08 PM IST

Updated : Jul 21, 2022, 10:55 PM IST

नवी दिल्ली :भारताच्या १५ व्या राष्ट्रपती ( 15th President Of India ) म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली ( Draupadi Murmu Elected As President Of India ) आहे. विरोधी यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला ( Yashwant Sinha Loses Presidential Battle ) आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली होती. मुर्मू यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उभे केले होते. 18 जुलैला या पदासाठी निवडणूक पार पडली. विजयी झाल्याने मुर्मू यांना देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत.

तिसऱ्या फेरीत झाला मार्ग मोकळा :मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत कटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा आणि पंजाब या राज्यांचा समावेश होता. या फेरीत एकूण वैध मते 1,333 होती. वैध मतांचे एकूण मूल्य 1,65,664 आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते, यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली. तर, या फेरीपर्यंत, एकत्रित एकूण वैध मते 3219 आहेत. त्यापैकी द्रौपदी मुर्मूला 2161 मते मिळाली आहेत. यशवंत सिन्हा यांना 1058 मते मिळाली आहेत.

यशवंत सिन्हा यांचे ट्विट :मी #द्रौपदीमुर्मूचे 2022 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो. मला आशा आहे-खरोखर, प्रत्येक भारतीयाला आशा आहे की- 15 व्या राष्ट्रपती म्हणून त्या बिनधास्तपणे किंवा पक्षपात न करता संविधानाच्या संरक्षक म्हणून काम करतील. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी देशबांधवांमध्ये सामील आहे, असे ट्विट विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

कुठून किती झाले मतदान :मतमोजणीनंतर कोणत्या उमेदवाराला कुठून किती मतदान झाले आहे याची आकडेवारी जाहीर झाली आहे. तर पाहुयात कोणत्या उमेदवाराला आहेत किती मते..

कुठून किती झाले मतदान

कोण आहेत द्रोपदी मुर्मू?

  • द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. पाच वर्षांची टर्म पूर्ण करणाऱ्या पहिल्या राज्यपाल ठरल्या.
  • झारखंडची स्थापना 2000 साली झाली. त्यानंतर 2015 ते 21 दरम्यान मुर्मू या राज्यपाल होत्या.
  • द्रौपदी मुर्मू या मुळच्या ओडिशा राज्याच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात.
  • ओडिशात त्या भाजपा - बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या.
  • 2000 ते 2004 दरम्यान त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या.
  • विशेष म्हणजे, द्रौपदी मुर्मू यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र दुखाने भरलेले आहे. मुर्मू यांच्या पतीचे निधन झालेले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकिर्द -1997 मध्ये मुर्मू या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होता. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. 2000 मध्ये त्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. ओडिशातील बीजेडी आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रालय सांभाळले. त्यानंतर 2000 ते 2004 दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि प्राणी संसाधन खात्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. 2015 मध्ये, मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती.

हेही वाचा :Draupadi Murmu Profile : संघर्षमय होते द्रौपदी मुर्मूंचे आयुष्य, जाणून घ्या जीवनप्रवास

Last Updated : Jul 21, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details