मुंबई डॉ. वर्गीस कुरियन ( Verghese Kurien ) यांना श्वेत क्रांतीचे जनक मानले जाते ( Father of the White Revolution ) . 13 जानेवारी 1970 रोजी देशात श्वेत क्रांतीला सुरूवात झाली. भारतातील दुधाच्या टंचाईवर मात करण्यासाठी भारताची योजना होती ( India face Milk shortage ). त्याला 'श्वेतक्रांती' असेही म्हणतात ( White Revolution ). डेअरी फार्मिंग, किंवा 'डेअरी इंडस्ट्री' किंवा 'दूध उद्योग' ही शेतीची एक श्रेणी आहे. हा पशुपालनाशी संबंधित एक अतिशय लोकप्रिय व्यवसाय आहे. ज्या अंतर्गत दूध उत्पादन, त्याची प्रक्रिया आणि किरकोळ विक्रीसाठी काम केले जाते.
मिल्क मॅन ऑफ इंडिया श्वेत क्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते( Verghese Kurien Father of the White Revolution). डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर,1921 रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी 1949 ला दूध उत्पादन क्षेत्रात सहभाग घेतला. त्यांच्यामुळे दुग्धव्यवसाय हा भारतातील सर्वात मोठा स्वावलंबी उद्योग बनला. त्यांनी सुमारे 30 संस्थांची स्थापना केली. ज्यात AMUL, GCMMF, IRMA, NDDB आदींचा समावेश आहे. डॉ. कुरियन यांना पद्मविभूषण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान, जागतिक अन्न पुरस्कार आणि समुदाय नेतृत्वासाठी मॅगसेसे पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.9 सप्टेंबर 2012मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या जाणून घेऊया या खास गोष्टी.
नॅशनल मिल्क डेदेशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना मांडणाऱ्या कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो ( National Milk Day ). म्हणजेच 26 नोव्हेंबरला 'नॅशनल मिल्क डे' साजरा केला जातो. अमूलची एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी प्रमुख दूध उत्पादक देशांमध्ये गायीऐवजी म्हशीच्या दुधाची पावडर उपलब्ध करून दिली. अमूलचे "आनंद मॉडेल" देशभरात प्रचलित करून दिले. जगातील सहकार चळवळीचे सर्वात मोठे समर्थक डॉ. कुरियन यांनी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतील लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.
दूध नावडता पदार्थ डॉ. कुरियन यांना दूध अजिबातच आवडत नव्हते. पण कालांतराने त्यांनीच दूध उत्पादनात क्षेत्रात मोलाचा वाटा उचलला. श्वेत क्रांती आधी भारतात. उपसमारी मोठ्या प्रमाणावर होती. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी ही पर्यत्न केले आणि देशात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले.
दूधाचा महापूर डॉ. कुरियन यांनी 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर ही योजना राबविली. त्यामुळे 13 जानेवारी 1970 रोजी देशात श्वेत क्रांतीला सुरूवात झाली. या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून उदयाला आला.