मुंबई- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे सरकार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. इंदू मिल येथील स्मारकासंबंधी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर सामंत म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणे हे उद्धव ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, ती पूर्ण केली जाईल. त्यासोबत सामंतांनी सांगितले, की लोणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागील 40 वर्षांची मागणी ठाकरे सरकारने पूर्ण केली आहे.
Mahaparinirvan Din 2021 Live Page : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन; घरबसल्या करा आंबेडकरांना अभिवादन
15:20 December 06
महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार - मंत्री उदय सामंत
11:49 December 06
चैत्यभूमिवर सामान्यांसह अनेक मान्यवरांनी केले महामानवाला अभिवादन
चैत्यभूमिवर सकाळपासूनच अनेक मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
सर्वसामान्य नागरिकांचीही रिघ सकाळपासून लागलेली आहे.
लोक कोरोनाचे नियम पाळून येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहून अभिवादन करत आहेत.
10:01 December 06
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो - नवाब मलिक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो - नवाब मलिक
लोकांवर हजारो वर्षे अन्याय होत होता
त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम बाबासाहेबांनी केले
समीर वानखेडे आल्यानंतर इथे काय गोंधळ झाला याबाबत मला माहिती नाही
मात्र बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा सर्वांना अधिकार आहे
09:58 December 06
चैत्यभूमीवर समीर वानखडे आल्यामुळे वाद
मुंबई
चैत्यभूमीवर समीर वानखडे आल्यामुळे वाद
समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही - अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांच्यासह समर्थकांनी केला विरोध
तर समीर वानखेडे यांनाही अभिवादन करण्याचा अधिकार म्हणत काहींनी केले समर्थन
09:27 December 06
राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह संसद सदस्यांची डॉ. आंबेडकर यांना आदरांजली
नवी दिल्ली - राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, LoP राज्यसभा मल्लिकार्जुन खरगे आणि इतर संसद सदस्यांनी आज डॉ. बी.आर. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
09:08 December 06
उपमुख्यमंत्र्यांनी दिली चैत्यभूमिस भेट, डॉ. आंबेडकरांना अभिवादन
मुंबई, दि. ६
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
08:52 December 06
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे चैत्यभूमीवर अभिवादन
मुंबई-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चैत्यभूमीवर केले अभिवादन
08:22 December 06
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान - मुख्यमंत्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान - मुख्यमंत्री
मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विनम्र अभिवादन करताना, स्वातंत्र्याचे अमृत क्षण आपण आज अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
06:52 December 06
असे करा घरबसल्या आंबेडकरांना अभिवादन
मुंबई -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2021) साजरा करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन केलं जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी (Followers At Chaityabhoomi) चैत्यभूमीवर देशभरातून अनुयायी दाखल होत आहेत. अनुयायांनी घरी थांबूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दादर येथील चैत्यभूमी येथे होणार असलेल्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. कोरोना संकट सुरू असल्यामुळे नागरिकांनी चैत्यभूमी येथे गर्दी करण्याऐवजी घरबसल्या लाइव्ह दर्शन घ्यावे, असे आवाहन भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.