महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dr APJ Abdul Kalam : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती; त्यांचे 10 विचार जाणून घ्या - Dr APJ Abdul Kalam birth anniversary

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांनी अनेक तरुणांना मार्ग दाखवला आहे. आज डॉ अब्दुल कलाम यांची जयंती ( Dr APJ Abdul Kalam birth anniversary ) आहे. जग त्यांना 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखत होते. डॉ कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती ( Dr APJ Abdul Kalam 11th President of India ) होते.

Dr APJ Abdul Kalam
डॉ. एपीजे अब्दुल कलाम

By

Published : Oct 15, 2022, 11:35 AM IST

नवी दिल्ली :'मिसाईल मॅन' आणि माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. डॉ. कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. संपूर्ण देशाला आज भारताच्या 'मिसाईल मॅन'ची आठवण येत आहे. डॉ.कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत ( Dr APJ Abdul Kalam quotes ) आहेत. डॉ अब्दुल कलाम यांचे काही अनमोल विचार आज या निमित्ताने जाणून घेऊयात.

डॉ. अब्दुल कलाम यांचे दहा प्रेरणादायी विचार

  1. जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे. ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नाही. जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे.
  2. पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.
  3. वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.
  4. जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे 3 लोक आहेत जे ते करू शकतात. हे वडील, आई आणि शिक्षक आहेत.
  5. जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमचे लक्ष्य ठेवा.
  6. जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते.
  7. यशस्वी होण्याचा आपला हेतू पुरेसा मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.
  8. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अपयशी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण अपयश म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.
  9. सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.
  10. हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details