महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dont wear jeans : जीन्स टीशर्ट सोडा, साडी चुडीदार घाला, दाढी करा केस सोडू नका मेडीकल मधे फतवा - जीन्स आणि टी शर्ट घालू नका

वैद्यकीय विद्यार्थ्यांनी जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालू नये, ( Dont wear jeans and T shirts ) दाढी करावी, केस सोडू नये, महिला मुलींनी साडी चुडीदार घालावा असा फतवा राज्य वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने (डीएमई) काढला आहे. ( AP State Directorate of Medical Education )

Dont  wear jeans
जीन्स आणि टी-शर्ट

By

Published : Dec 2, 2022, 12:50 PM IST

अमरावती: महिला मुलींचा ड्रेस कोड काय असावा हा कायम चर्चेचा विषय असतो. धार्मिक ठिकाणी कोणते कपडे घालावे या बद्दल तेथील संस्थान अटी घालत असते. पण एखाद्या शिक्षण संस्थेने असा ड्रे्स कोड लागु केला तर तो मोठ्या चर्चेचा विषय ठरतो. त्यातल्या त्यात मेडीकल सारख्या उच्च शिक्षण संस्थेत असा ड्रेस कोड लागु करण्याचा विषय अला तर तो आधिक चर्चेचा विषय ठरतो असाच एक विषय सध्या चर्चेत आला आहे.

आंध्र प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने( AP State Directorate of Medical Education) नुकत्याच आयोजित केलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या नंतर या संदर्भात काही निर्णय घेण्यात आले. या निर्णयाच्या संदर्भातील माहिती महाविद्यालयांना पाठवण्यात आली आहे. यात स्पष्ट करण्यात आले आहे की,वैद्यकीय विद्यार्थ्यांनी जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालू नये, ( Dont wear jeans and T shirts )

सहाय्यक, सहयोगी, प्राध्यापक आणि वैद्यकीय विद्यार्थ्यीनीनी फक्त साडी किंवा चुडीदार घालावा. एमबीबीएस तसेच पीजी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी स्वच्छ कपडे घालावेत. मुलांनी दाढी करावी, स्त्रियांनी केस सोडू नये, स्टेथोस्कोप आणि ऍप्रॉन घालणे आवश्यक आहे. काही विद्यार्थी, डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी ड्रेस कोडचे पालन करत नसल्याचे आढळून आल्यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details