केंद्र सरकारने पर्यावरण रक्षणासाठी (Save Atmosphere Save Life) एकदा वापराचे प्लास्टिक उत्पादन राेखण्याचे अभियान राबविले. या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी महिलांना आवाहन केले. त्याऐवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या कापडी पिशव्यांचा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. अशा कापडी पिशव्या १० वर्षांपर्यंत चालतील. या पिशव्या वागवणे जुनाट फॅशन वाटेल, मात्र यामुळे प्लास्टिक प्रदूषणापासून पृथ्वीचे रक्षण करण्यास (Use alternatives to plastic) मदत हाेईल. तसेच विविध रंगांच्या कागदी पिशव्या देखील आता उपलब्ध होत आहेत. दुसरीकडे, एअर इंडिया व रेल्वेनेही सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी (Dont Use Plastics) घालण्याची घाेषणा केली होती. एवढेच नव्हे तर, एअर इंडिया आणि रेल्वेने देखील प्लास्टीकच्या पर्यायी साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जसे की, चहासाठी पेपर कप वापरतात. आणि खाद्य पदार्थ खाण्यासाठी कागदी प्लेटस दिल्या जातात. Utility News
अनेक वर्षे नष्ट न होणारा हा कचरा :५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही मार्केटमध्ये भाजीवाले, फळवाल्यांकडे, किराणा दुकानात या पिशव्या सर्रास उपलब्ध होतात. तेल, दूध सुटे घेताना उपलब्ध होणाऱ्या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत नाहीत. त्यामुळे त्या गोळा केल्या जात नाहीत. त्यामुळे हा कचरा साठत (Non-biodegradable waste) जातो. अनेक पर्यावरणप्रेमी, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी हानी जाणवून जागरुक झालेले नागरिक प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रमाण फार कमी आहे. अद्यापही याबाबतीत नागरीकांचे डोळे उघडले नाही. आणि पुढील अनेक वर्षे अनेक प्रयत्न करुनही पृथ्वीवरुन घातक प्लास्टीकचे पुर्णत: उच्चटन करणे शक्य नाहीच. मात्र एकदा वापराचे प्लास्टिक उत्पादन राेखण्याचे कार्य प्रभावी व्हायला हवे.
नैसर्गिक चक्रास घातक (Plastics Harmful to the natural cycle) : प्लास्टिकच्या निर्मितीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश असतो आणि प्लास्टिक हे खूपच टिकाऊ असते. त्याचे विघटन नैसर्गिकरीत्या वर्षानुवर्षे होत नाही. प्लास्टिकचा हा गुणधर्म पाणी, माती, पर्यावरण यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकची अन्य उत्पादने ही इतस्ततः पडली आणि त्यांचा मातीशी संबंध आला तर पाणी झिरपण्याच्या स्वाभाविक व नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येणे, पाणी साचून राहणे, पाण्याचा स्तर असमतोल होणे आणि पर्यायाने त्या-त्या ठिकाणी मातीचा दर्जा खालावणे, असे दुष्परिणाम होतात. रासायनिक घटकांचा मातीवर परिणाम होतो तो वेगळाच. अशाचप्रकारे नदी, नाले व समुद्रातही भरमसाट प्रमाणात साचणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा खूप मोठा परिणाम पर्यावरणावर होतो. जलाशये आणि त्यांचे जे स्वाभाविक चक्र असते ते प्लास्टिकमुळे बिघडून जाते.
जलचरांवर परिणाम : आज मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी जाळ्या लावल्या तर त्यात जवळपास ७५ टक्के प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य कचराच जमा (Plastics Bad Effects on aquatic life) होतो. खूप पूर्वी पाण्यात प्लास्टिक हा प्रकारच नव्हता. तेव्हा जाळ्यांमध्ये काही प्रमाणात शेवाळ जमा व्हायचे, पण ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्तच होते. कारण शेवाळ हे जलचरांचे अन्न असते. आता मात्र शेवाळाची जागा प्लास्टिक कचऱ्याने घेतली आहे. समुद्रकिनारी साचणारा कचरा आणि तिवराच्या झाडांमध्येही प्लास्टिकच्या पिशव्या व इतर कचरा अडकून त्या भागांत बिघडलेले पर्यावरण यामुळे माशांच्या पैदाशीवरही खूप मोठा परिणाम झाला आहे. याच कारणामुळे पूर्वी आम्हाला समुद्रात एक तासात जी मासळी मिळायची ती आता तीन-तीन तास खूप आतवर प्रवास केल्यानंतर मिळते.
खाद्यपदार्थांनाही धोका :प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अधिक काळ खाद्यपदार्थ ठेवणेही आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. प्लास्टिक हे प्रामुख्याने द्रव स्वरुपातील खाद्यपदार्थांसाठी हानिकारक असते. संबंधित प्लास्टिक कंटेनर किंवा पिशवी याच्या आतील स्तराचा थेट द्रव खाद्यपदार्थाशी संबंध येतो. कालांतराने रासायनिक प्रक्रिया होऊन प्लास्टिकच्या त्या आतील स्तरातील रसायने विरघळून द्रव खाद्यपदार्थात थेट मिसळतात. त्यामुळे ते एकप्रकारे विषारी (स्लो पॉइझन) (poisons foods) ठरतात. प्लास्टिक कंटेनरमधील घन स्वरूपातील खाद्यपदार्थ आपण एक वेळ पाण्याने धुवून घेऊ शकतो. मात्र द्रव खाद्यपदार्थांच्या बाबतीत ते शक्यच नसते. त्यामुळे असे खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कंटेनरमध्ये शक्यतो न ठेवण्याची काळजी नागरिकांनी घ्यायला हवी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
जनावरां सोबतच आपलेही आरोग्य धोक्यात :शहरात सर्वच ऋतुंमध्ये गाईंना चारा उपलब्ध होत नाही. मग मोकाट सोडलेल्या गाई मिळेल त्या अन्नाच्या शोधात असातात. असे करतांना त्यांच्या पोटात अन्नाबरोबरच सर्रासपणे प्लास्टीकही जातो. त्याच गाईंचे दुध अनेक घरी पोहचवले जाते. म्हणजे नकळत ते प्लास्टीकचे घटक आपल्या मुलांच्या पोटातही जातात. मग यापासुन कॅन्सरच नव्हे तर अनेक बिमारी उद्भवतात. आणि एका विशिष्ट कालावधी नंतर आजारी पडून त्या जनावारांचा देखील मृत्यू होतो. संपुर्ण निसर्ग चक्र एकमेकांशी जोडले असतांना असे होणे, भविष्याच्या दृष्टीकोनातुन फारच घातक आहे. तेव्हा शेवटचा पर्याय म्हणुन आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी सतर्क होणे फार आवश्यक आहे.
प्लास्टीकला पर्यायी गोष्टींचा करा वापर :प्लास्टीकला आज अनेक पर्याय उपलब्ध (Use alternatives to plastic) झालेले आहेत. जसे की, कागदी व कापडी पिशव्या. कागदी ग्लास, प्लेट्स. झाडांच्या पाना पासुन तयार वस्तु, बांबु पासुन तयार अनेक वस्तु, प्लास्टीक ऐवजी कचेच्या व स्टीलच्या बॉटल, तागा पासुन निर्मित अनेक वस्तु, यांचा वापर केल्यास ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकचा वापर करणे, आपोआप कमी होईल.