बर्याच लोकांना असे वाटते, की केचप फक्त ताजे टोमॅटोने बनवले जाते. पण यात साखरेबरोबरच मीठ आणि फ्रक्टोज कॉर्न सिरप देखील चवीसाठी जास्त प्रमाणात टाकले जाते. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि प्रौढांमध्ये उच्च रक्तदाब होतो. केचपचे जास्त सेवन केल्यास शरीरातील साखर आणि सोडियमचे प्रमाण (ketchup is harmful for your health) वाढते. त्यामुळे शरीरात खनिजांचे असंतुलन होऊन आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे जास्त केचअप खाऊ (dont eat much ketchup) नका, असा सल्ला डॉक्टर देतात. health News . Utility News.
लठ्ठपणा आणि मधुमेह : केचपचे सेवन केल्याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. किमान फायबर आणि प्रथिने यांसारखे पोषक घटकही मिळत नाहीत. पण चवीनुसार साखर, मीठ, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि फ्रक्टोज कॉर्न सिरप घातल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ट्रायग्लिसराइड्स, विशेषत: उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्याचप्रमाणे इन्सुलिनच्या पातळीत बदल झाल्यामुळे मधुमेहाचा धोका असतो.
पचन समस्या :केचपमध्ये मॅलिक अॅसिड आणि सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे अॅसिडिटीसोबत छातीत जळजळ होते. या व्यतिरिक्त, तळलेले पदार्थ आणि जंक फूडसोबत याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या अधिक होऊ शकते. म्हणूनच गॅस्ट्रिक आणि इतर पचनाच्या समस्या असलेल्यांनी केचअप टाळावे, असे तज्ञ सुचवतात.