Cylinder Prices Increased : घरगुती सिलेंडरचे दर वाढले; किंमत पोचली 1 हजाराच्या टप्यात - घरगुती गॅसच्या किंमती
घरगुती वापरासाठी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसच्या (एलपीजी) दरात शनिवारी पुन्हा वाढ (Domestic cylinder prices increased) करण्यात आली आहे. तेल उत्पादक कंपन्यांनी जाहीर केलेल्या वाढीमुळे 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 50 रुपये अधिक असेल. त्यामुळे एका सिलिंडरच्या किमतीने 1000 रुपयांचा टप्पा (The price reached the stage of 1 thousand) ओलांडला आहे.
![Cylinder Prices Increased : घरगुती सिलेंडरचे दर वाढले; किंमत पोचली 1 हजाराच्या टप्यात Domestic cylinder](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15216856-thumbnail-3x2-lpg.jpg)
घरगुती सिलेंडर
नवी दिल्ली:घरगुती गॅसच्या किंमतीत (Domestic gas prices) 50 रुपयांची वाढ झाल्यामुळे सिलेंडरची किंमत आता हजाराच्या घरात (The price reached the stage of 1 thousand) पोचली आहे. उल्लेखनीय म्हणजे, रविवारी 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत देखील 102.50 रुपयांनी वाढली होती, जी पूर्वीच्या 2,253 रुपयांच्या तुलनेत आता 2,355.50 रुपये आहे. 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 655 रुपये झाली आहे.