इंदूर - नराधमाने कुत्र्याला सहाव्या मजल्यावरुन खाली फेकल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर प्राणी क्रूरता कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदूरमधील लासुदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पीपल फॉर अॅनिमल्सचे पियांशु जैन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इंदूर आणि भोपाळमध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांवर क्रूरता केल्याच्या घटना पुढे येत आहेत.
नराधमाने कुत्र्याला सहाव्या मजल्यावरून फेकले :इंदूर शहराच्या लासुदिया पोलीस ठाण्याच्या परिसरात नराधमाने कुत्र्याला सहाव्या मजल्यावरुन फेकल्याने खळबळ उडाली. रॉयल अमर ग्रीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून कुत्रा पडून मृत्यू झाल्याची ही घटना पीपल फॉर अॅनिमल्सचे पियांशु जैन आणि इतरांनी लासुदिया पोलिसांना दिली. सध्या पीपल फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून लासुदिया पोलिसांनी गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
प्राण्यांवर क्रूरतेच्या प्रकरणात वाढ :प्राण्यांवर क्रूरता केल्याच्या प्रकरणात इंदूरमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी एअरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार चालकाने बेदरकारपणे कुत्र्याला कारने धडक दिली होती. यात निष्पाप कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यानंतर हिरा नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन तरुणांनी एका कुत्र्याला बेदम मारहाण केली होती. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ उडाली होती. भोपाळमध्येही प्राण्यांवर क्रूरता केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एक तरुण कुत्र्याला एका मोठ्या तलावात फेकताना दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
पीपल फॉर अॅनिमल्सकडून तक्रार :सहाव्या मजल्यावरुन फेकण्यात आलेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ही माहिती पीपल फॉर अॅनिमल्स या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे पीपल फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत खात्री केली. त्यानंतर त्यांनी लुसिदिया पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात प्राणी क्रूरता कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती लासिदिया पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. इंदूर आणि भोपाळमध्ये प्राण्यांवर क्रूरता केल्याचे अनेक प्रकरणे पुढे आल्याने पीपल्स फोर अॅनिमल संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा - Bawankule On Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांचेच कारस्थान, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप