बंगळुरू- तुमकूर तालुक्यातील कुंडूर गावात कुत्री गायीच्या वासराला दूध पाजत ( dog gave milk to the calf ) असल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे. आठवडाभर वासरू कुत्रीचे ( Calf sucking dog in Karnataka ) दूध पित आहे. यामुळे लोक ( The dog breastfed the calf ) आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कुटुंबात नवीन पाहुणा किंवा बाळ येणार असले तर आपला आनंद गगनात मावत नाही. बाळ होणाऱ्या मातेचे औक्षण करून डोहाळे जेवण करून मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र बार्शीत यीला पहिल्यांदा वासरू होणार या निमित्ताने गायीचेही डोहाळे जेवण गतवर्षी करण्यात आले. या कार्यक्रमात पाहुण्यांना निमंत्रण देऊन मिष्टान्न जेवण देण्यात आले. आपल्या घरातील पशुंबद्दल प्रेम व्यक्त करत अनुभुले कुटुंबाने समाजाला आगळा वेगळा संदेश दिला होता.
मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा एकमेकांप्रती किती प्रेम आणि भावना असतात याची प्रचिती कोल्हापूरमधील एका घटनेमुळे आली होती. एका जखमी वासराला टेम्पोमध्ये घालून उपचारासाठी घेऊन जाताना त्या वासराची माय त्या टेम्पोमागे धावत आली. या घटनेमुळे आई ही शेवटी आईच असते याचा प्रत्यय अनेकांना आला होता.