महिलेसाठी आई होणे हे जगातील सर्वात मोठे सुख असते. गर्भधारणेचा काळ हे प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असतो. प्रत्येक आईला वाटते आपले बाळ निरोगी आणि गोरे ( Baby healthy and white ) असावे, मग आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे,( saffron milk during pregnancy ) यामुळे बाळ गोरपान होते. तसेच अनेक उच्च शिक्षित महिलांपासून खेडेगावांमधील असुशिक्षित महिला देखील आपले मूल गोरे आणि गोंडस व्हाव यासाठी केशव युक्त दुधाचे ( Saffron Milk ) सेवन करतात. पण खरेच केशर दूध प्यायल्याने बाळ गोर होते का? यामागे खरेच काय सत्य आहे. याला काही वैज्ञानिक कारण आहे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
काय होतात परिणाम? -केशरीयुक्त दुधाचे गरोदरपणात सेवन केल्याने ( Consumption of saffron milk during pregnancy ) त्याच्या आरोग्यास काही फायदे देखील होतात. तसे पाहायला गेले, तर केशर हे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी देखील आहे. गरोदरपणात केशरच सेवन केल्यामुळे महिलांचा असणारा तणाव बऱ्यापैकी कमी होत असल्याचे समोर आले आहे. गर्भवती महिलांनी जर नियमितपणे केशर युक्त दुधाचे सेवन केल्यास, महिलांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. प्रसूती होत असताना केशरमुळे महिलांचा त्रास कमी होत असल्याचे देखील समोर आले आहे.