महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Earthquake Tremors: भूकंपाच्या धक्क्यांत अनंतनागच्या रुग्णालयात डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती

भूकंपाचे धक्के जाणवत असताना अनंतनागच्या रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली आहे. मंगळवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याही परिस्थितीत डॉक्टरांनी आपले पार पाडले.

Earthquake Tremors
भूकंपाच्या धक्क्यांत डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती

By

Published : Mar 22, 2023, 12:23 PM IST

भूकंपाच्या धक्क्यांत डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती

श्रीनगर :जम्मू आणि काश्मीरमध्ये 21 मार्चला भूकंपाचे धक्के बसले. अनंतनाग जिल्ह्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सिझेरियन सेक्शनद्वारे बाळाला जन्म देण्यासाठी शस्रक्रिया सुरू केली होती. तेव्हा अचानक भूंकप सुरू झाला. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत होते. परंतु घाबरून न जाता, त्याही परिस्थितीत डॉक्टरांनी आपली शस्त्रक्रिया सुरू ठेवली. ही घटना मंगळवारी घडली.

व्हिडिओ समोर आला :अनंतनाग येथील उप जिल्हा रुग्णालय बिजबेहारा येथे आपत्कालीन लोअर-सेगमेंट सिझेरियन विभाग सुरू होते, त्या वेळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने ट्विट केले. त्यात त्यांनी 'एसडीएच बिजबेहराच्या कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. ज्यांनी एलएससीएस सुरळीतपणे पार पाडले. त्यांनी देवाचे आभार मानले की सर्व काही ठीक आहे. ट्विटमध्ये एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट हादरत असताना त्यांनी कामावर कसे लक्ष केंद्रित केले, हे दर्शविले गेले आहे.

६.६-रिश्टर स्केलचा भूकंप :अफगाणिस्तानातील हिंदुकुश प्रदेशात ६.६-रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यामुळे खोऱ्याला प्रचंड हिंसक धक्का बसला. धक्का बसल्यानंतर भागातील रहिवासी सुरक्षिततेच्या शोधात घराबाहेर धावले. दिल्ली-एनसीआर क्षेत्राव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातील एका रहिवाशाने सांगितले की त्याला परत तीन हादरे जाणवले.

अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के :मंगळवारी रात्री उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्ली आणि लगतच्या भागांसह उत्तर भारतातील लोकांना रात्री 10.17 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि त्यांना त्यांची घरे सोडून सुरक्षित आणि मोकळ्या भागात पळून जाण्यास भाग पाडले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, रिश्टर स्केलवर ६.६ तीव्रतेचा भूकंप मंगळवारी रात्री १०:१७ वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबादच्या १३३ किमीमध्ये झाला.

हेही वाचा : Himachal Earthquake News: हिमाचलमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप; अद्याप कोणतीही हानी नाही

ABOUT THE AUTHOR

...view details