मुंबई आठवड्यात सात दिवस असतात. सर्व सात दिवशी उपवास केले जातात. सर्व उपवासांपैकी सोमवारचा उपवास हा अतिशय शुभ मानला जातो. हे भगवान शंकराचे व्रत Lord Mahadev Pooja असून ते ठेवल्याने सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. पौराणिक ग्रंथानुसार सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. शिव स्वभावाने भोळा असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच सोमवारचा उपवास शूभ मानला जातो. त्याला प्रसन्न करून त्याची कृपा मिळावी या हेतूने सोमवारचे उपवास केले जातात. त्यामुळे शंकराची पूजा कशी करावी How to do Lord Mahadev pooja हे आता पाहूयात.
सोमवार हा भगवान शिवाचा दिवस सोमवार हा महादेवाचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. सोमवारचे व्रत देखील शिवाला समर्पित Lord Shiva Pooja आहे. भगवान शिव हा देवांचा देव महादेव आहे. जगाचा नाश करणारे महादेव लवकरच आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात असे म्हणतात. सोमवारी भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांचे दुःख दूर होते. सोमवारचा उपवास इच्छित वर मिळण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख शांती मिळण्यासाठी महिलांकडून ठेवला shiv pooja for marriage जातो. जे भक्त सोमवारी भगवान महादेवाला आवडीचा प्रसाद अर्पण करतात त्यांच्यावर शिवाचा आशीर्वाद होतो.
सोमवारी उपवासाची पद्धत आणि नियम पुराणानुसार, व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान केले पाहिजे. सोमवारी उपवास करण्याचे तीन प्रकार आहेत. सामान्य प्रदोष, सोम्य प्रदोष आणि सोळा सोमवार sola somvar . तिन्हींसाठी पद्धत सारखीच आहे. शक्य असल्यास व्रताच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. त्यानंतर व्रताचा उद्देष देवाला सांगितला जातो. दिवसा सकाळी आणि संध्याकाळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा Worship Lord Shiva and Parvati . या दिवशी पूजा करताना व्रताची कथा अवश्य ऐकावी, कारण त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. संध्याकाळी पूजेनंतर उपवास सोडावा. शास्त्रानुसार, श्रावण सोमवार व्रतामध्ये एक वेळच अन्न खावे.