स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे, ही एक सामान्य समस्या असली तरी, हेवी वर्क आउट केल्या नंतर सुध्दा स्नायूंमध्ये कमजोरी वाटणं किंवा दुखणं हे त्रास जाणवतात. पण थोड्या आरामानंतर बरं वाटायला लागतं आणि दुखणं थांबतं. पण जर का नेहमीच स्नायू अशक्त झाल्याचं, दुखत असल्याचं जाणवत असेल तर या त्रासांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं ठरते. यावेळी डॉक्टरांचा इलाज करण्याबरोबर आपण काही काही काळजी घेऊन, घरगुती इलाज सुध्दा सुरु केले पाहीजे. जाणुन घेऊया स्नायूंमध्ये बळकटी आणण्यासाठी (home remedies to strengthen muscles) कोणते घरगुती उपाय करावे ते. Good Health.
1. अंडी खालल्याने स्नायूंना आलेला अशक्तपणा आणि थकवा दूर व्हायला मदत होते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, डी, असतात. तसेच फॉलिक एॅसिड, अमिनो फॉलिक एॅसिड, प्रोटीन, योग्य प्रकारचे फॅट्स हे सर्व घटक स्नायूंना पोषणा साठी गरजेचे असतात.
2. चीज आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये असलेले casein protine पचनासाठी जड नसल्याने, स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. चीजमुळे व्हिटॅमिन बी 12 कॅल्शिअम सारखे उपयुक्त अन्न घटक शरीराला मिळतात.
3. आवळ्यात असणारे कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन बी, प्रोटीन स्नायूंच्या बळकटीसाठी उत्तम असतात.