पाटणा :बिहारमधील हवामानाचा मूड बदललेला दिसत आहे. प्रचंड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे याआधीच अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट जारी केला आहे. जोरदार गडगडाट ( Thunderstorm for several districts of Bihar ) होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत सतर्क राहण्याची गरज असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे.
या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा इशारा : जो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यात पूर्णिया पूर्व, जलालगड, कसबा, श्रीनगर, रुपौली, भवानीपूर, अमौर, बैसा, बैसी, डगरुआ, पुनिया जिल्ह्यातील ब्लॉकचा समावेश आहे. याशिवाय कटिहार जिल्ह्यातील हसनगंज, कोर्हा, फलका, कुरसेला, बरारी, ब्लॉकसाठीही अलर्ट जारी करण्यात आला आहे. अररिया जिल्ह्यातील अररिया, जोकीहाट, रानीगंज, फोर्ब्सगंज ब्लॉकमध्ये लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.