अर्धशिशी हा चेतासंस्थेचा (stay away from Migraine) आजार आहे. यामध्ये हलक्या ते उच्च तीव्रतेची डोकेदुखी वारंवार होत राहते. ही डोकेदुखी विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागातच होते आणि यामध्ये डोके दोन तासांपासून ते दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस दुखत राहते. जेव्हा अर्धशिशीचा अटॅक येतो तेव्हा या व्याधीने ग्रस्त व्यक्तीला उजेड आणि आवाज अजिबात सहन होत नाही. वांती होणे, मळमळणे आणि कोणतेही शारीरिक काम केल्याने डोक्यातील वेदना वाढणे ही अर्धशिशीच्या आजाराची काही सामान्य लक्षणे आहेत.Good Health
यातून सुटका कशी करायची? :जर तुम्ही अनेक वर्षांपासून डोक्याचा भुगा करून टाकणाऱ्या डोके दुखीने त्रस्त आहात किंवा तुम्हाला अर्धशिशी आहे असे निदान केले गेले आहे. तर औषधोपचाराव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत ज्याने तुमच्या दुखण्यावर विजय मिळवता येईल. धमनीची शस्त्रक्रिया, स्नायूंची शस्त्रक्रिया, डोक्याच्या मागील भागांच्या मज्जातंतूंचे उद्दीपन, बोटाँक्स, बीटा-ब्लॉकर्स आणि नैराश्य घालवणारी औषधे हे काही उपचार आहेत जी अर्धशिशीच्या अटॅकला प्रतिबंध पद्धती म्हणून वापरली जातात. परंतू सावधान: या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम आहेत. यातील काही उपचारांमुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, निद्रानाश आणि मळमळणे किंवा अन्नाचा तिटकारा या व्याधींचा धोका वाढतो.