महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DMK Women Rights Conference : तामिळ भाषेचा अभिमान हा जात, धर्मासह भाषेपलीकडचा आहे-सुप्रिया सुळे - विविध राज्यातील राजकीय पक्षांच्या महिला नेत्यांनी

DMK Women Rights Conference : चेन्नईत द्रमुक महिला संघातर्फे महिला हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला विविध राज्यांतील राजकीय पक्षांच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात भाजपा सरकारवर टीका केली.

DMK Women Rights Conference
DMK Women Rights Conference

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 12:46 PM IST

Updated : Oct 15, 2023, 1:14 PM IST

चेन्नई DMK Women Rights Conference : माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त द्रमुक महिला संघाच्या वतीनं चेन्नईच्या नंदनम येथं महिला हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत द्रमुकसह 'इंडिया' या आघाडीतील विविध पक्षांच्या महिला नेत्या सहभागी झाल्या होत्या. या परिषदेत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव, बिहारच्या राज्यमंत्री लेशी सिंह आदी महिला नेत्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाजपा सरकारवर या महिला नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय.

खासदार डिंपल यादव काय म्हणाल्या : या महिला हक्क परिषदेत बोलताना, उत्तर प्रदेश राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव म्हणाल्या, "करुणानिधी यांनी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण वाढवलं होतं. तसंच, त्यांनी सामाजिक न्याय आणि महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. तामिळनाडू महिलांचे हक्क, लैंगिक समानता आणि महिलांसाठी मालमत्ता अधिकार यासारख्या विविध प्रकल्पांमध्ये आघाडीवर आहे. महिलांच्या हक्कांसाठी द्रमुकच संसदेत आवाज उठवत आहे. मणिपूरची घटना आपण कधीही विसरणार नाही. तेथील महिलांवर होणारे अत्याचार आपण सहजासहजी विसरू शकत नाही. तसंच, मणिपूर राज्यातील घटना ही मोदींच्या राजवटीत भारत मागासल्याचं उदाहरण आहे. मोदी सरकार संसद आणि विधानसभेत महिला आरक्षण लागू करण्यास टाळाटाळ करत आहे. मोदी सरकार जनतेचं प्राधान्यक्रम कमी करतंय, असंही खासदार डिंपल यादव यांनी म्हटलंय.

तामिळनाडूशी माझं जवळचं नातं - सुप्रीया सुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी "सेंथामिल नाडेनम बोथिनिले" या भारतीय कवितेनं आपल्या भाषणाला सुरुवात करत म्हणाल्या, तामिळनाडूचं कौतुक करणं मला बंधनकारक आहे. द्रमुक सतत तामिळनाडूच्या हक्कांसाठी बोलतंय. तामिळ भाषेचा अभिमान म्हणजे सामाजिक न्याय, जात, धर्म आणि भाषा या सगळ्याच्या पलीकडं आहेत. तामिळ लोक भाषेसाठी एकत्र येतील. तामिळ भाषेवर तामिळींचा हक्क आहे. तमिळ आणि मराठी या दोन गोष्टींमध्ये साम्य आहे. तामिळनाडूशी माझं जवळचं नातं आहे. तामिळनाडूमध्ये स्त्रिया सुंदर थाली घालतात. मी विशेषतः तामिळनाडूची ऋणी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी चेन्नईला येते तेव्हा मी माझ्या आईसाठी 2 किलो चमेलीची फुलं विकत घेत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काय म्हणाल्या राज्यमंत्री लेशी सिंह : बिहारच्या राज्यमंत्री लेशी सिंह म्हणाल्या, "भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या महिलांचा विकास थांबवता येत नसल्याचं उदाहरण आहे. तामिळनाडूप्रमाणेच बिहारमध्येही नितीशकुमार सरकार महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवत आहेत. 33% आरक्षणासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गंभीर प्रयत्न केले आहेत. पण आता आणि लगेच अंमलबजावणीच्या दृष्टीनं मोदी सरकारनं महिला आरक्षण कायदा आणलेला नसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच मार्क्सवादी-कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोच्या सदस्य सुबाशिनी अली म्हणाल्या, "आम्ही सामाजिक न्याय, लैंगिक समानता आणि आर्थिक समानतेसाठी लढण्याच्या स्थितीत आहोत."

हेही वाचा :

  1. Supriya Sule : अजित पवारांचा गट कोण चालवतंय? सुप्रिया सुळेंनी थेटच सांगितलं...
  2. Manipur Violence CWC Meeting : मणिपूर हिंसाचारात भाजपानं तेल ओतलं, काँग्रेसनं भाजपाला धुत
  3. PM Modi on INDIA Alliance : इंडिया आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे; पंतप्रधान मोदींची टीका
Last Updated : Oct 15, 2023, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details