महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tamilnadu Crime : सैनिक पत्नीशी झालेल्या वादाच्या रागात नगरसेवकाकडून सैनिकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू - उपचारांअभावी सैनिकाचा मृत्यू

तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात लष्कराच्या जवानाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. येथे द्रमुकच्या एका नगरसेवकाने महिलेशी झालेल्या भांडणानंतर तिच्या सैनिक पतीला बेदम मारहाण केली, ज्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Tamilnadu Crime
नगरसेवकाकडून सैनिकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

By

Published : Feb 16, 2023, 11:42 AM IST

चेन्नई (तामिळनाडू): तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील वेलमपट्टीजवळील सार्वजनिक नळासमोर कपडे धुत असलेल्या द्रमुक नगरपरिषद आणि सैनिकाची पत्नी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पत्नीच्या बचावासाठी आलेल्या लष्कराच्या जवानावर द्रमुकच्या नगरसेवकाने हल्ला केला, त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर उपचारादरम्यान लष्करातील जवानाचा मृत्यू झाला. घटनेनंतर द्रमुक नगरसेवक फरार झाला आहेत. पोलीस फरार आरोपी नगरसेवकाचा शोध घेत आहेत.

चिन्नास्वामी द्रमुकचा नगरसेवक :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिन्नास्वामी (50) असे आरोपीचे नाव आहे. तो कृष्णागिरी जिल्ह्यातील बोचम पल्लीजवळील वेलमपट्टी येथील रहिवासी आहे. चिन्नास्वामी हा नागोजनहल्ली नगरपालिकेच्या प्रभाग-१ चा ते द्रमुकचा नगरसेवक आहेत. प्रभाकरन (३०) आणि त्याचा धाकटा भाऊ प्रभू (२९) एकाच परिसरात राहतात, दोघेही सैन्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी प्रभाकरनची पत्नी प्रिया घरासमोरील सार्वजनिक नळाजवळ कपडे धूत होती.

कपडे धुण्याच्या कारणावरून वाद : यादरम्यान नगरसेवक चिन्नास्वामी तेथे पोहोचला आणि त्यांच्यात वाद झाला. चिन्नास्वामी याने सैनिकाच्या पत्निला तिथे कपडे न धुण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र, तेथे उपस्थित लोकांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला. दोघांनाही तेथून पाठवले. यानंतर या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या द्रमुकचे नगरसेवक चिन्नास्वामी यांने 10 हून अधिक लोकांसह महिलेचा पती प्रभाकरन आणि त्याचा लहान भाऊ प्रभू यांच्यावर दगड आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ला केला.

सैनिकाचा मृत्यू : या हल्ल्यात प्रभाकरन गंभीर जखमी झाला होता. त्यांना होसूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. अशा स्थितीत बुधवारी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. तर फरार डीएमके नगरसेवक चिन्नास्वामीसह अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

इशिका शर्माच्या खूण्याला अटक :छत्तीसगडच्या जांजगीर चंपा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या इशिका शर्मा खून प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवालात या हत्येची पुष्टी झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी दरोडा आणि खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 4 पथके तयार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस रायगड बिलासपूर आणि बालोदा बाजारकडे निघाले होते. आरोपी रोहन पांडूचे इशिकाच्या घरी येणे-जाणे होते. पोलिसांना त्याच्यावरच संशय होता. पोलिसांनी आरोपी रोहन पांडू याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सर्व काही आरोप फेटाळून लावले होते. नंतर चौकशीत हत्याकांडाचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा :Chase away Tipu lovers : टिपू सुलतानवर प्रेम करणाऱ्यांनी पृथ्वीवर राहू नये; नलिन कुमार कटील यांचे वादग्रस्तच वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details