महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Opposition Party Meeting: देशभरातील विरोधी पक्षांची अजून एक बैठक, डीएमकेने केले आयोजन - डीएमकेने केले विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन

विरोधी पक्षांची आणखी एक बैठक बोलावण्यात आली असून द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी ही बैठक बोलावली आहेत. यापूर्वी स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्तही विरोधी पक्षांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी होणारी बैठक नवी दिल्लीत होत आहे.

DMK CALLS FOR OPPOSITION PARTY MEETING ON MONDAY
देशभरातील विरोधी पक्षांची अजून एक बैठक, डीएमकेने केले आयोजन

By

Published : Apr 2, 2023, 7:22 PM IST

नवी दिल्ली : द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सोमवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेससह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आहे. या बैठकीत काही नेते ऑनलाइनद्वारे सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे.

आम आदमी पार्टीचे संजय सिंह, बीआरएसचे केशव राव आणि टीएमसीचे डेरेक ओब्रायन सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी द्रमुक प्रमुख स्टॅलिन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. उद्याच्या बैठकीचा अजेंडा पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. द्रमुकनेही या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे वक्तव्य माध्यमांना दिले आहे. त्यानुसार सामाजिक न्यायाबाबत बैठक बोलावण्यात आली आहे.

मोठे नेते राहणार उपस्थित:या बैठकीला आरजेडीचे तेजस्वी यादव, सपाचे अखिलेश यादव, एनसीचे फारूख अब्दुल्ला, सीपीएमचे सीताराम येचुरी आणि सीपीआयचे डी राजा उपस्थित राहणार आहेत. बीजेडीचे सस्मित पात्रा आणि वायएसआरचे ए सुरेश देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनाही सहभागी होऊ शकते. तसे, बीजेडी आणि वायएसआरच्या वतीने सांगण्यात आले आहे की बैठकीत सामाजिक न्यायाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत. या बैठकीत त्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार की नाही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

काही पक्षांची भूमिका स्पष्ट नाही:बीजेडी आणि वायएसआरने अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे भाजपशी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि अनेक प्रसंगी या दोन्ही पक्षांनी सरकारला पाठिंबाही दिला आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये या पक्षांच्या सहभागाचे अनेक राजकीय परिणाम होऊ शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष एका व्यासपीठावर येऊन भाजपचा एकत्रित सामना करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मिरात कारमध्ये अचानक झाला स्फोट, कारण

ABOUT THE AUTHOR

...view details