महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

'बाबा का ढाबा' बंद करून रेस्टॉरंट सुरू केलेल्या कांता प्रसाद यांच्यावर ते बंद करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यातच मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. कांता प्रसाद यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न
'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Jun 18, 2021, 2:27 PM IST

नवी दिल्ली - 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. कांता प्रसाद यांना कोरोनामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले. बाबा का ढाबा बंद करून सुरू केलेले रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, आर्थिक अडचणी सुटत नसल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्या व्यथा ऐकून, पाहून बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या मदतीतून त्यांनी ढाबा बंद करत नवे रेस्टॉरंट सुरू केले. मात्र, लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट तोट्यात गेल्याने कांता प्रसाद यांना ते बंद करावे लागले. मात्र, लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याने रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे.

कांता प्रसाद यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क साधला असता बाबांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे निदर्शनास आले. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. बाबांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details