वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2022) 25 ऑक्टोबर 2022 रोजी (Diwali will be last solar eclipse of the year) होणार आहे. कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. अमावस्या तिथीबद्दल बोलायचे झाले तर ती 24-25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राहील. अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 05 वाजुन 27 मिनिटांनी सुरू होत आहे. जी 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 04 वाजुन 18 मिनिटांपर्यंत चालेल. मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे.(Eclipse Sutak times and mythology)
आंशिक सूर्यग्रहण : हे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण आहे जे 2022 चे दुसरे सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण प्रामुख्याने युरोप, ईशान्य आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या काही भागातून दिसणार आहे. भारतात ग्रहण नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी, मथुरा येथे दिसणार आहे. असेही सांगण्यात येत आहे की, पूर्व भारत वगळता काही राशींवर याचा चांगला परिणाम होऊ शकतो. तर काही राशींवर वाईट परिणाम होऊ शकतो. परिणाम ग्रहण वेळ काय आहे? सुतक कालावधी किती आहे? ग्रहण काळात कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घ्या.
सूर्यग्रहण म्हणजे काय :जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा, पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण हे अमावस्या दिवशी दिसते. परंतु सर्वच अमावस्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्वच अमावस्या दिवशी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पृथ्वीच्या कक्षेत आणि चंद्राच्या कक्षेत पाच अंशाचे किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असते. परंतु अमावस्याला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते.
सूर्यग्रहण वेळ :भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजुन 29 मिनिटांनी सुरु होईल तर, 5 वाजुन 30 मिनिटांनी संपेल. म्हणजे हे ग्रहण 1 तास 14 मिनिटांपर्यंत असेल. असेही सांगितले जात आहे की सूर्यास्तानंतर हे ग्रहण संध्याकाळी 05 वाजुन 43 मिनिटांनी पूर्ण होईल.
सुतक कालावधी :मिळालेल्या माहितीनुसार, ग्रहणाच्या आधीचा काळ अशुभ मानला जातो आणि त्याला सुतक काळ (Eclipse Sutak times and mythology) म्हणतात. सुतक काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही तसेच या काळात कोणत्याही व्यक्तीने नवीन कार्य सुरू करू नये, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी १२ तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतरच संपतो. असे म्हणतात की ग्रहण कुठेही दिसत नसेल तर सुतक नाही. या वेळी भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे, त्यामुळे सुतक वैध असेल. आंशिक सूर्यग्रहणाचे सुतक पहाटे 03:17 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05:43 वाजता समाप्त होईल.
काय करावे , काय करू नये :ज्योतिष शास्त्रानुसार सुतक काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. सुतक काळात देवाची पूजा करावी. सुतक काळात अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका. अन्न तयार ठेवल्यास त्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत. सुतक काळात दात स्वच्छ करणे आणि केस विंचरणे हे देखील निषिद्ध आहे. सुतक काळात देवाच्या मंदिराचे दरवाजे बंद करावेत. सुतक काळात सूर्यमंत्रांचा जप करावा. सुतक कालावधी संपल्यानंतर घराची साफसफाई करावी आणि त्यानंतर देवाची पूजा करावी. सुतक काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडू देऊ नका आणि विशेष खबरदारी घ्या. सूर्यग्रहणाच्या वेळी "ओम आदित्य विदमहे दिवाकराय धीमही तन्न सूर्य: प्रचोदयात" या मंत्राचा जप करावा.
ग्रहण आख्यायिका :हिंदू पौराणिक कथेनुसार ग्रहण राहु आणि केतू या ग्रहांशी संबंधित आहे. असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी अमृताने भरलेल्या कलशासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. तेव्हा त्या युद्धात राक्षसांचा विजय झाला आणि राक्षस कलशांसह अधोलोकात गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी अप्सरेचे रूप धारण केले आणि असुरांकडून तो अमृत कलश घेतला.
भगवान विष्णूंना सांगितले : यानंतर जेव्हा भगवान विष्णू देवतांना अमृत देऊ लागले, तेव्हा स्वरभानू नावाच्या राक्षसाने कपटाने ते अमृत प्यायले होते आणि देवांना याची माहिती मिळताच त्यांनी भगवान विष्णूंना याबद्दल सांगितले. यानंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे डोके सोंडेपासून वेगळे केले. असे म्हटले जाते की, स्वरभानूच्या शरीराचे फक्त दोन भाग राहू आणि केतू म्हणून ओळखले जातात आणि देवतांकडून झालेल्या अपमानाचा बदला घेतल्यानंतर सूर्य आणि चंद्राचा बदला घेण्यासाठी तो वारंवार ग्रहण घेतो. Surya Grahan 2022